दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता दरवर्षीप्रमाणे प्रश्नपत्रिका 10 मिनिट अगोदर मिळणार नाही! जाणून घ्या महत्वाची माहिती | Maharashtra State Board Exam Update

मित्रांनो जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची यावर्षीची दहावीची तसेच बारावीची परीक्षा देणार आहेत, अश्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे दहा मिनिटे अगोदर मिळणारी प्रश्नपत्रिका मिळणार नाही. तर याचे कारण काय आहे? महाराष्ट्र बोर्डाने हा निर्णय का घेतला यासंदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात दरवर्षी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत स्टेट बोर्डाची दहावी आणि बारावीची Maharashtra State Board Exam आयोजित करण्यात येत असते. लाखोच्या संख्येने या परीक्षांना राज्यातून अनेक विद्यार्थी सामोरे जात असतात. परंतु राज्यातील अनेक भागात दरवर्षी पेपर फुटीच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे त्यांचा पेपर सोडवतात, अशा विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसतो.

 

दहावी आणि बारावीची परीक्षा पूर्वी कशी व्हायची?

मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाच्या मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येत होती. त्यामुळे विद्यार्थी पेपर सुरू होण्याच्या दहा मिनिटांपूर्वी संपूर्ण प्रश्न वाचून घेत होते. तसेच प्रश्नपत्रिका तील कोणते प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहेत, याचा अंदाज घेऊन त्या क्रमाने पेपर सोडवत होते.

परीक्षेच्या कालावधी पूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्यामुळे अनेक वेळा या प्रश्नपत्रिका वायरल केल्या जात होते.

 

दहावी आणि बारावीची परीक्षा आता कशी होणार? Maharashtra State Board Exam 2023 Changes

दहावी बारावी परीक्षा 2023 नवीन वेळापत्रक जाहीर; लगेच पहा वेळापत्रक

परंतु जुन्या पद्धती नुसार अनेक ठिकाणी अनेक सेंटरवर याचा गैरफायदा घेण्यात येत होता. पेपर फुटीचा धोका निर्माण होत होता. त्यामुळे यंदाची दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणारी यामध्ये बदल केलेला असून आता विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार नाही. या संदर्भातील महत्त्वाची परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या मार्फत काढण्यात आलेली आहे.

 

अशी करण्यात येणार परीक्षेची अंमलबजावणी

मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी जीपीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागाकडून भरारी पथक तसेच बैठी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. तसेच पेपर फुटीचा धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!