राज्य शासनाचा महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय; गाई साठी 70 हजार तर म्हशी साठी 80 हजार मिळणार | Maharashtra Mantrimandal Baithak 2023

शेतकरी मित्रांनो पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची बातमी प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांकरिता अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असणारा निर्णय म्हणजे Pashu Samvardhan Yojana Maharashtra अंतर्गत गाई व म्हशी यांच्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे.

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण अशी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांच्याबरोबरच राज्याची उपमुख्यमंत्री आणि इतर सर्व मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. या बैठकीमध्ये दुधाळ जनावरांच्या गट वाटप योजने संदर्भात महत्त्वपूर्ण असा बदल करून आता एका गाई साठी 70 हजार रुपये अनुदान तर एका म्हशी करिता 80 हजार रुपये अनुदान ठरवून देण्यात आलेले आहे.

 

गाई साठी 70,000 व म्हशी साठी 80,000 अनुदान कसे मिळणार? Pashu Samvardhan Yojana

राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या या बैठकीमध्ये राज्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध पशुसंवर्धन विभागाच्या योजना अंतर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप करणारी महत्त्वपूर्ण अशी योजना असते. या Pashu Samvardhan Yojana अंतर्गत आता शेतकरी बांधवांना गायीच्या खरेदी करिता 70 हजार रुपये तर म्हशीच्या खरेदी करिता 80 हजार रुपये मिळणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना या Pashu Samvardhan Yojana 2023 Maharashtra अंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना अंतर्गत अर्ज करावा लागेल.

 

गाई व म्हशी करिता 80 हजार अनुदान मिळण्याचा अर्ज कसा करा, येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले इतर महत्त्वपूर्ण निर्णय:

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत म्हणून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा स्वीकार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये 12 नवीन समाजकार्य महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पदभरती अंतर्गत उमेदवारांकडून स्वीकारण्यात येणारे परीक्षा शुल्क आता निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच भूतपूर्व दुय्यम सेवा निवड महामंडळाच्या कक्षेतील पद भरतीच्या सर्व परीक्षा आता टीसीएस किंवा आयबीपीएस या नामांकित कंपनीद्वारे घेण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना अंतर्गत दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेत 460 कोटी रुपये मंजूर करून प्रशासकीय मान्य करण्यात आलेली आहे.

 

शेळी व मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन अंतर्गत 50 लाख रुपये अनुदान मिळण्याकरिता अर्ज सुरू, येथे क्लिक करून अर्ज करा.

 

राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेतलेले आहे त्या संदर्भात माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!