शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अनेक प्रकारच्या योजना या शेतकरी बांधवांकरिता राबविण्यात येत आहेत. या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकरी बांधवांना नोंदणी करून वेगवेगळ्या योजनांकरिता अर्ज करता येतो. महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी काढून निवड करण्यात येत असते. त्यामुळे आता महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेची MahaDBT Farmers Lottery List जाहीर झालेली आहे.
राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी त्यांना जलसिंचनाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ठिबक सिंचन व तुषार सिंचन करिता त्यांचे अर्ज ऑनलाईन सादर केलेले होते. त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर Thibak Sinchan Tushar Sinchan Lottery List काढण्यात आलेली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना लॉटरीमध्ये निवड झाल्याची माहिती ही एसएमएसच्या द्वारे पाठवण्यात आलेली आहे.
महाडीबीटी तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेची यादी कशी पहायची? How to Check Thibak Sinchan Yojana List ?
शेतकरी मित्रांनो जर तुम्ही महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर तुषार सिंचन व ठिबक सिंचन या घटकांकरिता अर्ज केलेला असेल, तर तुम्हाला तुमची महाडीबीटी शेतकरी योजनांच्या MahaDBT Farmers List मध्ये निवड झाली का, ते चेक करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी फार्मरच्या वेबसाईटवर लॉगिन करायचं आहे. त्यानंतर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.
1. यादीमध्ये नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर्स पोर्टलवर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लगीन करून घ्या.
2. आता तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी हा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक करा.
3. आता तुम्ही जेवढे अर्ज केलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल.
4. त्यापैकी ज्या योजनेसमोर विनर असे नाव दिसत असेल, ती योजना तुम्हाला लागलेली आहे. म्हणजेच त्या योजनेच्या ऑनलाईन सोडती मध्ये तुमची निवड झालेली असून तुम्हाला लाभ मिळवता येणार आहे.
5. जर योजनेच्या नावासमोर Eligible फोर लॉटरी असा ऑप्शन असेल तर तुमची निवड ही शेतकरी योजनांच्या ऑनलाईन सोडती मध्ये झालेली नाही, असे समजावे.
ज्या शेतकरी बांधवांची महाडीबीटी शेतकरी योजनांच्या तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन योजनेच्या ऑनलाईन Mahadbt farmer maharashtra lottery list मध्ये निवड झालेली आहे. त्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस देखील पाठवण्यात आलेला आहे.
शबरी आवास योजना अंतर्गत 93288 घरकुल वितरित होणार; नवीन निर्णय जाहीर, कुणाला मिळेल लाभ? जाणून घ्या!
तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेच्या सोडत यादीमध्ये नाव आले? आता पुढे काय करायचे?
ज्या शेतकरी बांधवांची निवड महाडीबीटी शेतकरी योजनांच्या तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेच्या mahadbt farmer maharashtra lottery list मध्ये झालेली आहे. अशा शेतकऱ्यांनी आता त्यांची योजनेची संदर्भात सर्व कागदपत्रे अपलोड करावयाची आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर लॉगिन करावे त्यानंतर ज्या योजने करिता निवड झालेली आहे त्या, योजनेच्या संदर्भात आवश्यक ती बिले तसेच वस्तू खरेदी केल्याची सर्व कागदपत्रे आणि अर्जदाराची वैयक्तिक कागदपत्रे ही अपलोड करावयाची आहे.
पी एम किसान योजना सर्व गावांची नवीन यादी जाहीर; अनेकांची नावे वगळण्यात आली!
खालील कागदपत्रे अपलोड करा.
1. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सातबारा व आठ अ उतारा (सातबारा आठ तलाठी यांच्याकडून मिळवलेला किंवा डिजिटल स्वाक्षरी मध्ये असलेला अपलोड करू शकतात. सहा महिन्याच्या आतील अपलोड करावा.)
2. जर शेतकऱ्यांचे शेत जमिनीचे क्षेत्र सामायिक असेल तर त्याबाबत संमती पत्र
3. अर्जदार अज्ञान असल्यास अ पा क स्वयंघोषणापत्र
4. जात प्रमाणपत्र
5. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज.
6. पूर्वसंमती पत्र
ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना जिल्हा निहाय याद्या खालील प्रमाणे:
उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या व्हॉट्स अप ग्रुप जॉईन करून मिळतील, आम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव पाठवा.
अशाप्रकारे महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर तुषार सिंचन वर ठिबक सिंचन ची नवीन सोडत यादी जाहीर झालेली आहे. या संदर्भात एक छोटीशी अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.