मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत 4 लाख रुपये अनुदान नवीन अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा | Magel Tyala Vihir Suru

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात कृषी विभाग यांच्यामार्फत मागेल त्याला विहीर योजना ही राबविण्यात येत आहे. यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्यात विहीर अनुदान योजना ही मनरेगाच्या अंतर्गत राबविण्यात येणार होती, आता ही योजना मागेल त्याला विहीर योजना असे नाव बदलून पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. विहीर अनुदानाच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली असून आता शेतकऱ्यांना Magel Tyala Vihir Yojana अंतर्गत 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

Magel Tyala Vihir Anudan Yojana Maharashtra अंतर्गत शेतकऱ्यांकडून नवीन अर्ज स्वीकारणे सुरू झालेले असून ज्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये विहीर पाहिजे असेल त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करायचे आहेत. मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत शासनाच्या मार्फत विहिरीची मर्यादा वाढवण्यात आलेली असून आता सर्व शेतकरी बांधवांना ज्यांच्या शेतामध्ये विहीर नाही त्यांना विहीर बांधकाम करण्याकरिता चार लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

 

मागेल त्याला विहीर योजना करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Vihir Yojana:

मित्रांनो जर तुम्हाला विहीर मिळवायची असेल तर चार लाख रुपये अनुदानासाठी मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. जॉब कार्ड

2. शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा व आठ अ

3. प्रपत्र अ व प्रपत्र ब

4. आधार कार्ड

5. रेशन कार्ड

6. जातीचा दाखला

मित्रांनो जर तुमच्याकडे वरील कागदपत्रे असेल आणि तुमच्या शेत जमिनीचे सातबारावर विहिरीची नोंद नसेल तर तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात.

मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत 4 लाख रुपये अनुदान अर्ज येथे करा

मागेल त्याला विहीर योजना 2023 अर्ज कसा करायचा? How to Apply for Magel Tyala Vihir Yojana

शेतकरी मित्रांनो मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत विहीर खोदकाम करण्याकरिता चार लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज तुमच्या ग्रामपंचायत मध्ये करायचा आहे. सध्या ग्रामपंचायत मध्ये मागेल त्याला विहीर योजनेचे अर्ज स्वीकारणे सुरू असून लवकरात लवकर अर्ज करावा.

विहिरीचा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे तो अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून घ्या तसेच त्याची प्रिंट करा. आणि व्यवस्थित भरून ग्रामपंचायत मध्ये नेऊन द्या.

 

विहीर योजना चार लाख रुपये अनुदान अर्ज येथे पहा

 

अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना विहीर बांधकाम तसेच खोदकाम करिता चार लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. ही माहिती तुमच्या संपर्कातील सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारच्या शेती योजना विषयक माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!