जमिनीचे जुने रेकॉर्ड असे पहा ऑनलाईन; तुमच्या जमिनीची कुंडली ऑनलाईन उपलब्ध | Land Record Online

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आपल्याला आपल्या जमिनीच्या जुन्या नोंदी तसेच जमिनीचे सर्व जुने रेकॉर्ड ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता कोणालाही त्याच्या जमिनीची संपूर्ण जुनी माहिती घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पाहण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ही माहिती उपलब्ध करून दिलेली असून या पोस्टमध्ये आपण जमिनीचे Land Record Online पाहण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहण्याची आवश्यकता का आहे? Why is it necessary to see old land records?

आपण आपल्या जमिनी बरोबरच जमिनीचे सुद्धा रेकॉर्ड ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतो. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून नवीन जमीन खरेदी करणार असाल तर तुमच्या सोबत कोणताही धोका होऊ नये यासाठी आपण जी जमीन विकत घेणार आहोत त्या जमिनीचे संपूर्ण जुने रेकॉर्ड पाहणे आवश्यक असते. त्या जमिनीचे संपूर्ण फेरफार तसेच इतर सर्व रेकॉर्ड ऑनलाईन पद्धतीने चेक करून ती जमीन खरेदी करायला पाहिजे.

 

त्याचबरोबर तुमचा एखाद्या जमिनीशी संबंधित वाद असेल किंवा तुमची जमीन दुसऱ्याच्या नावावर असेल किंवा काही दुसरे अडचणी असतील तर त्या जमिनीची संपूर्ण कुंडली आपण ऑनलाइन चेक करू शकतो.

 

 

जमिनीचे जुने रेकॉर्ड ऑनलाइन कसे पहायचे? Jamin Record Online Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या महसुली विभागाने जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार ऑनलाइन पाहण्यासाठी अधिकृत पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या जमिनीचे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने चेक करायचे असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

1. सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र राज्याची महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन करा.

2. महसूल विभागाची https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in ही व्यवसाय तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ओपन करा.

3. आता तुम्हाला या वेबसाईटवर E-RECORDS (ARCHIVED DOCUMENTS) हा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

4. जर तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदाच आलेले असाल तर न्यू यूजर म्हणून नोंदणी करून घ्या.

5. आता या वेबसाईटवर लॉगिन करा आता नवीन फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी प्रविष्ट करायची आहे.

6. आता तुम्ही संपूर्ण माहिती भरा त्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड तयार करून लॉगिन करून घ्या.

7. आता या ठिकाणी तुमचं गाव निवडा आणि तुम्हाला जो कागदपत्र पाहिजे आहे त्या कागदपत्राचा प्रकार निवडायचा आहे.

8. जर तुम्हाला फेरफार पाहायचा असेल तर फेरफार पाहण्यासाठी त्या जमिनीचा गट नंबर टाकून सर्च करा.

9. आता तुम्हाला ज्या वर्षीचा आणि ज्या क्रमांकाचा फेरफार पाहायचा आहे तो फेरफार कार्ट मध्ये ठेवायचा आहे.

10. आता तुम्हाला रिव्ह्यू कार्ट हे ओपन करून नेक्स्ट पर्यावर क्लिक करायचं आहे.

11. त्यानंतर व्ह्यू फाईल वर क्लिक करून तुम्ही जो फेरफार डाऊनलोड केलेला आहे, ते पाहू शकतात.

12. अशाच प्रकारे तुम्हाला जे कागदपत्र पाहिजे त्या कागदपत्रावर क्लिक करून तुम्ही ते कागदपत्र या ठिकाणी ऑनलाइन चेक करू शकतात.

जमिनीचे जुने रेकॉर्ड ऑनलाइन पाहण्याची लिंक 

अशाप्रकारे आपल्याला अगदी सहजपणे ऑनलाईन पद्धतीने आपल्या जमिनीचे सर्व जुने रेकॉर्ड पाहता येते. शेत जमिनीच्या दृष्टीने कोणताही बदल करण्यासाठी फेरफार घेण्याची तो त्यामुळे तुम्ही तुमच्या जमिनीचा फेरफार ऑनलाइन पद्धतीने पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचे सर्व जुने रेकॉर्ड मिळून जातील. फेरफार बरोबर इतरही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. ते देखील तुम्ही त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडून चेक करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!