मित्रांनो आपल्याला आपली शेत जमीन जर मोजायची असेल तर त्याकरिता आपल्याला तहसील कार्यालयात अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अगदी सहजपणे आपण आपल्या मोबाईल वरून कोणतीही जमीन मोजू शकतो. तुम्हाला तुमची शेतजमीन मोजण्याकरिता शेतात जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आपण घरबसल्या मोबाईलवर एप्लीकेशनच्या माध्यमातून आपली जमीन मोजू शकतो. मोबाईल वरून घर बसल्या Land Measurement संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्याला नवीन जमीन खरेदी केल्यानंतर किंवा वडिलोपार्जित जमीन वडिलांनी आपल्या नावावर केल्यानंतर जमिनीशी संबंधित अनेक वादाला सामोरे जावे लागते. ज्यावेळेस आपल्याला आपली जमीन कसण्यासाठी ताब्यात घ्यायची असते अशा वेळेस जर ती जमीन वेडी वाकडी असेल किंवा चढउताराची असेल तर त्या जमिनीची Land Measurement Online Maharashtra करणे खूप कठीण जाते.
त्यामुळे आपण स्वतः जमिनीची मोजणी करू शकत नाही तसेच जर आपण शासकीय पद्धतीने जमीन मोजणी करायची ठरवल्यास त्याकरिता खूप पैसे खर्च करावे लागतात तसेच या प्रक्रियेस खूप मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमची शेत जमीन मोजायचे असेल तर ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून ही आपल्याला मोजता येते. शेतजमीन आपण आपली आपल्या शेत जमिनीच्या बांधावरून फिरून मोजू शकतो तसेच घरबसल्या सुद्धा ही जमीन मोजण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे.
मित्रांनो शेत जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने डिजिटायझेशन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व सुविधा शेतकऱ्यांना मोबाईल वरून उपलब्ध व्हाव्या यासाठी महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असून शेतीशी संबंधित सर्व योजना तसेच सर्व बाबी ऑनलाईन उपलब्ध झालेले आहेत. आता आपल्याला आपल्या शेतातील सातबारावर पिकांची नोंद स्वतः करावी लागते ती सुद्धा मोबाईल वरून. तसेच आता आपल्याला आपल्या शेत जमिनीचा सातबारा काढण्यासाठी तलाठी कडे चकरा मारण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाइन पद्धतीने मोबाईल वरून शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी येथे क्लिक करा
आपल्याला आपली शेतजमीन घरबसल्या ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून मोजण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या गुगल मॅप च्या साह्याने तुमच्या जमिनीवर क्लिक करून तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ मोजू शकतात. किंवा ते एप्लीकेशन इन्स्टॉल केलेला मोबाईल हातात धरून तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावरून फिरून देखील तुमच्या जमिनीची अचूक मोजणी करू शकतात.
शेत Land Measurement Using App वरून करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येत नाही किंवा पैसे पेड करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही शासकीय मोजणी करू इच्छित नसाल आणि तुमची जमीन चढ उताराची असेल तर वरील पद्धतीने तुम्ही अगदी सहजतेने त्या जमिनीची मोजणी करू शकतात.