कुसुम सोलर पंप योजना 2023 करिता नवीन अर्ज सुरू; 2 लाख सौर कृषी पंप वितरित होणार | Kusum Solar Pump Yojana Maharashtra

शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने पीएम कुसुम योजना ही संपूर्ण देशामध्ये तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा राबविण्यात येत आहे. या पी एम कुसुम सोलर योजना अंतर्गत राज्यातील जवळपास दोन लाख शेतकरी बांधवांना सोलर पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पीएम कुसुम योजना अंतर्गत Kusum Solar Pump मिळवण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अर्ज करायचे आहेत.

 

मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याकरिता पीएम कुसुम योजनेचे दोन लाख सौर कृषी पंप वाटप करण्याची जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना यावर्षी मोठ्या प्रमाणात सौर कृषी पंपाचे वितरण होत आहेत. Solar Pump Yojana Maharashtra अंतर्गत शेतकरी बांधवांकडून नवीन अर्ज स्वीकारण्यात येत असून पात्र असलेल्या शेतकरी बांधवांना सौर पंप मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येत असून उर्वरित जिल्ह्यांकरिता सुद्धा लवकरच Kusum Solar Pump Yojana Maharashtra नवीन अर्ज सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांकरिता जे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये सोलर पंप बसू इच्छित आहेत, अशा शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमी आहे.

नियमित कर्ज माफी 50000 प्रोत्साहन अनुदान योजना पुढील 4थी व 5वी यादी या तारखेला येणार

मित्रांनो शेतकरी बांधवांना 24 तास सौर पंपाच्या माध्यमातून वीज उपलब्ध व्हावी तसेच शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या कोणत्याही प्रकारच्या सुविधांचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना महापारेषण तर्फे 1 लाख pm Kusum Solar pump वितरित करण्यात येणार आहेत. शेतकरी बांधवांना सौर कृषी पंप मिळाल्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त पिकं घेऊ शकतील आणि त्यांचे उत्पन्न वाढतील उत्पन्न वाढल्यास शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.

 

कुसुम सोलर पंप मिळण्याकरिता अर्ज कसा करायचा? How to Apply for PM Kusum Solar Pump Yojana

शेतकरी मित्रांनो Kusum Solar Pump योजना अंतर्गत शेतकरी बांधवांकडून अर्ज स्वीकारण्यात येत असून टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. सध्या राज्यात महापारेषण मार्फत एक लाख सौर कृषी पंप वितरित करण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कुसुम सोलर पंप मिळवायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे.

 

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत येथे अर्ज करा

 

टीप: शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना संदर्भात अनेक प्रकारच्या बोगस वेबसाईट आहेत, ज्या तुम्हाला पैशाची मागणी करू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचा अर्ज अधिकृत वेबसाईटवरूनच करायचा आहे. तसेच कोणत्याही अनोळखी वेबसाईटवरून अर्ज करू नये तसेच पैशाची मागणी केल्यास पैसे देऊ नये.

बैलगाडी अनुदान योजना महाराष्ट्र; 2023 करिता 100 टक्के अनुदानावर अर्ज सुरू

येणाऱ्या पुढील पोस्टमध्ये आपण कुसुम सोलर पंप योजने संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे नियमितपणे या वेबसाईटवर भेट देत राहा. ही माहिती सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!