सर्वात महत्वाची बातमी, खरीप पिक विमा 2022 खात्यात जमा होण्यास सुरुवात! Kharip Pik Vima Update

शेतकरी मित्रांनो राज्यातील खरीप पिक विमाधारक शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी प्राप्त झालेली आहे. राज्यातील या शेतकरी बांधवांनी खरीप पिक विमा 2022 काढलेला होता, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये kharip pik vima 2022 ची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण खरीप पिक विमा 2022 रक्कम वितरणाबाबत प्राप्त झालेली अपडेट जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो जर तुम्ही खरीप पिक विमा 2022 हा भरलेला असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पिक विमा कंपनीच्या मार्फत काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पिक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकांचा Kharip Pik Vima उतरलेला आहे. त्यांच्यासाठी ही महत्वाची Kharip Pik Vima Update आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये सततचा पाऊस झालेला होता. तसेच अनेक वेळा अतिवृष्टी सुद्धा झालेली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नुकसान झालेले होते.

 

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा उतरलेला होता त्यांनी पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई चे दावे दाखल करण्यास सुरुवात केलेली होती. अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे kharip pik vima 2022 विम्याचे क्लेम केलेले होते परंतु बऱ्याच ठिकाणी शासनाने वेळोवेळी निर्देश देऊन सुद्धा पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा केलेली नव्हती. त्यामुळे राज्यातील अनेक खरिपाचा पिक विमा उतरलेले शेतकरी पिक विमा मिळण्याची वाट पाहत होते.

 

अजून पर्यंत पिक विमा मिळाला नसेल तर, असा करत पिक विमा कंपनीकडे दावा दाखल; येथे क्लिक करून जाणून घ्या पिक विमा तक्रार कशी करायची?

 

खरीप पिक विमा 2022 वितरित Kharip Pik Vima Nidhi Vitarit:

त्यामुळे आता काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने पिक विमा कंपन्यांना राज्य शासनाच्या हिस्स्याची 724 कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केलेली होती. त्यामुळे उर्वरित जे शेतकरी नुकसान होऊन सुद्धा पिक विमा मिळण्यापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांना लवकर दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. त्याच अनुषंगाने पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई दावे दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे

पिक विमा यादी येथे क्लिक करून पाहा; यादीत तुमचे नाव चेक करा

 

या शेतकऱ्यांना मिळाला पिक विमा:

मित्रांनो पिक विमा कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली असून राज्यातील नांदेड तसेच ठाणे व सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये Kharip Pik Vima रक्कम जमा झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरिपाचा पिक विमा जमा झालेला आहे, त्यांना बँकेकडून पिक विमा जमा झाल्याचे एसएमएस प्राप्त होत आहेत. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

जर तुम्हाला अजून पर्यंत खरिपाचा पिक विमा मिळालेला नसेल आणि तुम्ही पिक विमा नुकसान भरपाई दावा दाखल केलेला असेल, तर तुम्ही कृषी अधिकारी यांच्याकडे दाद मागू शकतात तसेच तुम्ही केलेल्या पिक विमा क्लेम चे स्टेटस देखील ऑनलाइन चेक करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!