मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्ष 2022 मध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे खरीप पिक विमा धारक शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या खरीप पिकाचा Pik Vima उतरवलेला होता, अशा शेतकऱ्यांना पिक विमा वितरण करण्याची मागणी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मार्फत करण्यात येत होती. अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या मार्फत पहिल्या टप्प्यातील पिक विमा वितरित करण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यातील Kharip Pik Vima 2023 करण्यासंदर्भात एक दिलासादायक अपडेट आपल्याकडे आलेला आहे.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याची वितरण सुरू झालेले आहे. त्यामध्ये कोणते शेतकरी लाभार्थी म्हणून ठरणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम किती मिळणार आहे. या pik vima nidhi vitaran संदर्भात संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यात 2022 मध्ये झालेल्या सततचा पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची दावे पिक विमा कंपन्यांकडे केलेले होते. त्याच अनुषंगाने वेळोवेळी राज्य शासनाने पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना pik vima वितरित करण्याची निर्देश दिलेले होते. काही जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान आढळून आले त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना अग्रिम स्वरूपात 25 टक्के पिक विमा वितरित करण्यात आलेला होता. पिक विम्याची पहिल्या टप्प्यातील रक्कम अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे.
परंतु शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने अतिशय कमी रक्कम वितरित केल्याची तक्रार कृषी विभागाकडे शेतकऱ्यांमार्फत करण्यात येत होती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित असलेला पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांमार्फत करण्यात येत होती. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्या मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील Kharip Pik Vima ची रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
हे नक्की वाचा:अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यांची नवीन लाभार्थी यादी आज जाहीर; लगेच नाव पहा
या जिल्ह्यासाठी 200 कोटी पिक विमा मंजूर:
मित्रांनो राज्यातील उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा अपडेट आपल्याकडे आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 258 कोटी रुपये पिक विमा च्या माध्यमातून वितरित करण्याची माहिती प्राप्त झालेली असून लवकरच शेतकऱ्यांना 200 कोटी रुपये Pik Vima Nidhi वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 200 कोटी रुपये पिक विमा जमा करण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. येत्या आठवड्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 200 कोटी रुपये पिक विमा वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळालेली आहे.
धाराशिव जिल्ह्याला 200 कोटी रु पिक विमा वितरित
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2022 चा Kharip Pik Vima पहिल्या टप्प्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या नव्हता त्यांच्या खात्यावर 200 कोटी रुपये पिक विमा वितरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे. विमा कंपनीने महाव्यवस्थापक सहसंचालक श्री शितवेज राम सुब्रमण्यम यांनी आश्वस्त केल्याची माहिती आ. राणा जगत सिंह पाटील यांनी दिलेली आहे.
त्यामुळे या जिल्ह्यातील पिक विमा पासून वंचित असलेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांना लवकरच खरीप पिक विमा 2022 चा दोनशे कोटी रुपये निधी मिळणार आहे.