खरीप पिक विम्याचे 724 कोटी रुपये लवकरच या शेतकऱ्यांना मिळणार; सरसकट पिक विमा मंजूर शासन निर्णय जाहीर | Kharip Pik Vima 2023 Nidhi Vitarit

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील खरिपाचा पिक विमा काढणाऱ्या सर्व शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिक विमा धारक शेतकरी बांधवांना खरीप पिक विम्याचे वाटप करण्यासाठी 724 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. याचा फायदा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना होणार आहे.

 

Kharip Pik Vima Maharashtra संदर्भात महत्वपूर्ण अशी अपडेट प्राप्त झालेली आहे. शेतकरी मित्रांनो 724 कोटी रुपयाचा पिक विमा हा राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा असून या पोस्टमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मिळणार आहे या Kharip Pik Vima 2023 संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेत आहोत. राज्यातील अनेक शेतकरी बांधवांना त्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन सुद्धा अजून पर्यंत पिक विमा मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी जे नुकसान ग्रस्त असून सुद्धा पिक विमा पासून वंचित होते, ते पिक विमा मिळण्याची वाट पाहत आहेत.

 

याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचे वाटप व्हावे, या दृष्टीने राज्य शासनाच्या हिश्याची पिक विमा कंपनीस वितरित करावयाची 724 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करून वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो शासनाच्या या kharip pik vima nidhi Vitaran मुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधवांना आता खरीप पिक विमा 2023 मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

कुसुम योजना सर्व जिल्ह्यांची पात्र व अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर; लगेच पहा

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने 13 जानेवारी 2023 रोजी पिक विमा निधी वितरण संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला आहे. या pik vima yojana maharashtra शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकांचा खरीप पिक विमा 2023 काढलेला होता. आणि त्यांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला होता, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच आता ही पिक विम्याची 724 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

वैयक्तिक शेततळे योजना महाराष्ट्र लाभार्थी यादी जाहीर; लगेच यादीत नाव चेक करा

724 कोटी रुपये पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार

शेतकरी मित्रांनो राज्यातील राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांना खरीप पिक विमा वाटप करण्याचे आदेश दिलेले होते. तसेच ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या भागामध्ये पिक विमा कंपन्यांनी 25% पीक विम्याची आगाऊ रक्कम वितरित करण्याचे सुद्धा सांगितले होते. काही जिल्ह्यांमध्ये ही pik vima yojana रक्कम वितरित सुद्धा करण्यात आलेली होती परंतु राज्यातील अनेक शेतकरी नुकसानग्रस्त असून सुद्धा पिक विमा पासून वंचित असल्यामुळे राज्य शासनाने खालील शासन निर्णय जाहीर केलेला आहे.

 

724 कोटी रुपये पिक विमा निधी वितरणाचा शासन निर्णय येथे पहा

 

मित्रांनो अशा प्रकारे राज्य शासनाच्या वतीने kharip pik vima शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ही रक्कम वितरित करण्यास मंजुरी दिलेली असून लवकरच पिक विमा कंपन्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2023 चे वितरण करतील अशी अपेक्षा आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पिक विमा निधी वितरणा संदर्भात छोटीशी अपडेट जाणून घेतलेली आहे. पुढील अपडेट मध्ये हा निधी कोणत्या जिल्ह्याला कशाप्रकारे वितरित करण्यात आलेला आहे. या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊया.

Leave a Comment

error: Content is protected !!