मित्रांनो खरीप हंगाम संपलेला आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या घरात कापूस साठवून ठेवलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा आहे, परंतु कापूस हा शेतकऱ्यांना दिवसेंदिवस खूप छळत आहे. शेतकऱ्यांनी कापसावर केलेला खर्च यावर्षी निघणार की नाही याची चिंता शेतकऱ्याला लागलेली आहे. मित्रांनो कापसाच्या बाजार भाव वाढीसाठी मार्च महिना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पुढे Kapus Bajarbhav कसे राहतील, मार्च महिन्यात कापसाच्या बाजारभावावर काय परिणाम होतील या संदर्भातील माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो यावर्षी कापसाला गेल्यावर्षीपेक्षा चांगला भाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरात अजून कापूस साठवून ठेवलेला आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ही एक चांगलीच शक्कल लढवली आहे. परंतु Kapus Bajar bhav पाहता यावर्षी उलटे चक्र दिसत आहे.
पुढील दोन महिने कापसाचा बाजार भाव कसा राहील? वाढेल की घटेल, ते इथे पहा
कापसाला सलग दुसऱ्या वर्षी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी या महिन्यामध्ये दहा हजार पार कापूस होता, परंतु यावर्षी कापूस 8000 पेक्षा जास्त भाव मिळवून देत नाही आहे. परंतु सध्या येथे आठवड्याचा कापसाच्या दराचा विचार करता मध्यंतरी आठ हजार पेक्षा कमी झालेला हा भाव आता थोड्याफार प्रमाणात आठ हजार आठशे रुपये पर्यंत वाढताना दिसत आहे.
कापसाचे बाजार भाव पुन्हा 12000 पेक्षा जास्त होणार; जाणून घ्या तज्ञांच्या मते
कापसासाठी मार्च महिना महत्त्वाचा!
कापूस बाजार भाव वाढतील यापेक्षा मुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडलेले आहेत. आणि आता मार्च महिना लवकर सुरू होणारा असून शेतकऱ्यांच्या मनात मोठी भीती निर्माण झालेली आहे. कोणताही शेतकरी मार्च एंडिंग ला मोठ्या प्रमाणात घाबरतो कारण की शेतकऱ्यांना वाटते की मार्च महिना म्हणजे कोणत्याही बाजार भावाचा घटता महिना होय.
मित्रांनो कापूस बाजारभावासाठी पुढील चार आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहे, कापूस बाजारभावाची घटना संबंधित असणाऱ्या अनेक घटना यामध्ये घडणार आहे. त्यातील पहिली आणि महत्त्वाची घटना म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच cia फेब्रुवारी महिन्याबाबतची अंदाजपत्रक (कापसाचे उत्पादन आणि मागणी पुरवठा बाबतचे) प्रकाशित होणार आहे. तसेच कमोडिटी एक्स्चेंजवर कापूस वायदे नव्याने चालू होईल. तसेच मार्च एंडिंग मध्ये पैशाची गरज भासत असल्यामुळे अनेक व्यापारी जास्त प्रमाणात या महिन्यांमध्ये व्यवहार करत नाही.
कापूस बाजार भाव बाबत अमेरिकन कृषी विभागाचा अहवाल:
अमेरिकन कृषी विभागाने भारतातील कापूस उत्पादनाच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता दर्शविण्यात आलेली आहे. तसेच भारतात आयात करण्यात येणारा कापूस हा कमी दाखवलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढत असल्याची चिन्ह दिसत आहेत. परंतु देशभराचा कापूस बाजार भावाचा विचार करता देशात कापसाचे बाजार भाव हे नऊ हजार पेक्षा खाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसातील Cotton Market Rate चा विचार करता थोड्या प्रमाणात कापसाच्या बाजारभावात वाढ झालेली आहे.