मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी कांदा चाळ योजना सुरू करण्यात आलेली आहे. या कांदा चाळ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कांदा चाळ प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्फत अनुदान वितरित करण्यात येत असते. सध्या ही Kanda Chaal Yojana शासनाने सुरू केलेली असून या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येत आहेत. Kanda Chaal Yojana Maharashtra संदर्भात मिळालेल्या नवीन अपडेट संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो कांदा या पिकाचे उत्पादन घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कांदा चाळ असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी स्वतः पूर्ण खर्च करून कांदा चाळ प्रकल्प सुरू करू शकत नाही. लहान शेतकरी तसेच मध्यम शेतकरी कांदा चाळ प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणारा खर्च स्वतः करू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासन राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुदान देत आहे.
कांदा चाळ का गरजेची आहे?
मित्रांनो कांदा हे पीक नाशवंत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कांदा काढल्यानंतर त्याची साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाची असते. परंतु शेतकऱ्याकडे कांदा साठवण्याकरिता पुरेशी जागा नसते. तसेच कांदा साठवता येत नसल्यामुळे अनेक कांदे खराब होतात. परंतु कांदा चाळ मध्ये ठेवलेला कांदा हा व्यवस्थित राहतो. कांदा चाळ प्रकल्पात ठेवलेला कांदा खराब होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा चाळ अनुदानातून मिळाल्यास नक्कीच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
कांदा चाळ उभारणी प्रकल्प योजना राबविण्यास मान्यता
मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून कमी खर्चात कांदाचाळ प्रकल्प सन 2023-24 मध्ये राबविण्यास मान्यता दिलेली आहे. या Kanda Chaal Yojana च्या अंमलबजावणी करिता महाराष्ट्र शासन 101 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे शासनाच्या मार्फत वितरित करण्यात येणाऱ्या निधीमुळे नवीन शेतकऱ्यांना अर्ज करून लाभ मिळवता येणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केलेला आहे त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार कांदा चाळ प्रकल्प योजना
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, सोलापुर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये कांदा चाळ प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात दोन वर्षाकरिता राबविण्यात येणार असून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येईल.
कांदा चाळ प्रकल्पाकरिता राज्य शासन 40% खर्च करणार आहे तर केंद्र शासन 60 टक्के खर्च करणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला तसेच तालुक्याला ठरवून देण्यात आलेल्या लक्षांका नुसार लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 बोनस जाहीर; शासन निर्णय आला!
कांदा चाळ योजने करिता अर्ज कसा करायचा? How to apply for Kanda Chaal Yojana?
मित्रांनो Kanda Chaal Project योजना अंतर्गत जर तुम्ही लाभ मिळवून इच्छित असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा आहे. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड ही ऑनलाइन सोडतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात येणार असून त्यानंतर शेतकऱ्यांची योजनेअंतर्गत मोका तपासणी तसेच जिओ टॅगिंग करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येईल.
कांदा चाळ प्रकल्प योजना ऑनलाईन अर्ज येथे करा
कांदा चाळ योजना सुरू करण्यासंदर्भातील शासन निर्णय येथे पहा
कांदा चाळ प्रकल्प योजना संदर्भातील ही महत्त्वाची माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.