कडबा कुट्टी मशीन मशीन खरेदी करण्यासाठी नवीन अर्ज सुरू; 75 टक्के अनुदान, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा | Kadba Kutti Machine Yojana

मित्रांनो शेतकरी बांधवांना जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 75 टक्के अनुदान वितरित करण्यात येत आहे. या कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत उर्वरित 25 टक्के भरून शेतकरी कडबा कुट्टी मशीन खरेदी करू शकतात. राज्य सरकारकडून याकरिता अनुदान देण्यात येत असून अर्ज कसा करायचा? लाभ मिळण्याकरिता आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे या Kadba Kutti Machine Yojana Maharashtra संदर्भाची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजना अंतर्गत अनेक प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असतात. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे पशुपालक शेतकरी बांधवांना त्यांच्या जनावरांना चारा व्यवस्थितपणे खाऊ घालण्यासाठी Kadba Kutti Machine वितरित करण्यात येत असते. या योजनेचे नाव Kadba Kutti Machine Yojana आहे. शेतकरी स्वतः शंभर टक्के रक्कम खर्च करून ही महागडी मशीन खरेदी करू शकत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जनावरे असतात त्यांना ही मशीन अत्यावश्यक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानित तत्त्वावर कडबा कुट्टी मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जर आपण आपल्या जनावरांना चारा जशाला तसा टाकला तर जनावर तो चारा व्यवस्थितपणे खाऊ शकत नाही. जर आपण त्याच चाऱ्याचे Kadba Kutti Machine च्या सहाय्याने तुकडे तुकडे करून टाकले तर जनावर तो संपूर्ण चारा खातो. जनावराच्या दृष्टीने तो चारा फायदेशीर असतो. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही कडबा कुट्टी मशीन अत्यंत आवश्यक आहे. परंतु कमी पशुंची संख्या असणारे शेतकरी ही मशीन खरेदी करू शकत नाही.

 

वैयक्तिक शेततळे योजना महाराष्ट्र लाभार्थी यादी जाहीर; लगेच यादीत नाव चेक करा

कडबा कुट्टी मशीन मिळवण्याकरिता पात्रता Eligibility Criteria for Kadba Kutti Machine Yojana

1. या Kadba Kutti Machine Yojana अंतर्गत केवळ ग्रामीण भागातील शेतकरी लाभ मिळवू शकतात.

2. शेतकऱ्यांकडे अनुदानाची रक्कम मिळवण्याकरिता बँक खाते असणे आवश्यक आहे

3. अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर दहा एकर पेक्षा कमी शेती असावी.

4. शेतकऱ्यांची बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असावे.

घरकुल यादी 2023 जाहीर; अशी पहा सर्व जिल्ह्यांची नवीन घरकुल यादी

आवश्यक कागदपत्रे:

1. बँक पासबुक

2. सातबारा व आठ अ उतारा

3. आधार कार्ड

4. रेशन कार्ड

वरील सर्व कागदपत्रे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता अर्जदारांकडे असणे आवश्यक आहे.

कडबा कुट्टी मशीन करिता अर्ज कसा करायचा? How to apply for Kadba Kutti Machine Yojana 2023 Maharashtra?

मित्रांनो कडबा कुट्टी मशीन योजना ही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात येत असते. त्यामुळे कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज हा शेतकरी बांधवांना जिल्हा परिषदेकडे ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचा असतो. ज्या जिल्हा परिषदेअंतर्गत योजना राबवण्यात येत असते त्यावेळेस तुम्हाला अर्ज करायचा असतो.

 

कडबा कुट्टी मशीन ऑनलाईन अर्ज येथे करा

 

शेतकरी मित्रांनो वरील लिंक वरून अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्हा परिषदेअंतर्गत अर्ज करायचा असल्यास तुम्ही योजना सुरू झाल्यानंतर अर्ज करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!