या शेतमजुरांना मिळत आहे जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान; जाणुन घ्या कुणाला मिळेल लाभ, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे | Jamin Kharedi Anudan Yojana

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शेतमजुरांना जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येत आहे. म्हणजेच महाराष्ट्र शासन शेतमजुरांना मोफत जमीन खरेदी करून देत आहे. मोफत शेत जमीन खरेदी करून देणारी योजना म्हणजेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना होय. या Jamin Kharedi Anudan Yojana Maharashtra अंतर्गत कोणते व्यक्ती तसेच शेतमजूर लाभ मिळवू शकतात. लाभ मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा तसेच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे या संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो महाराष्ट्रराज्यात महाराष्ट्र शासनाच्या मार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही यापूर्वी राबविण्यात आलेली होती. सन 2023 24 मध्ये ही योजना राबविण्यासाठी तसेच या योजनेअंतर्गत राखीव असलेल्या निधी खर्च करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढून मान्यता दिलेली आहे. मित्रांनो भूमिहीन असणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही Dadasaheb Gaykwad Sabalikaran Yojana पुन्हा सुरू झाल्यामुळे अनेक शेतमजुरांना शासनाकडे जमीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

 

दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतमजुरांना तसेच भूमिहीन नागरिकांना अर्ज करून लाभ मिळवता येतो.

जर तुम्ही सुद्धा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व्यक्ती असाल तर तुम्हाला शासनाच्या या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर जमीन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या Jamin Kharedi Anudan Yojana अंतर्गत अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे यांची सुद्धा माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

 

जमीन खरेदी अनुदान योजनेची अंमलबजावणी

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना मोफत शेतजमीन वितरित करण्यात येते. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत ही योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने 14 ऑगस्ट 2018 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला होता. या शासन निर्णयानुसार या jamin kharedi anudan yojna 2023 ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मोफत शेतजमीन मिळण्यासाठी करावयाचा अर्ज येथे पहा

आता नवीन शासन निर्णय काढून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण अशा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत सन 2022 23 करिता शासनाने तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान मिळवण्यासाठी येथे अर्ज करा

म्हणजेच आता या योजनेअंतर्गत जे अर्जदार आहेत, त्यांना जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील असणारे तसेच भूमिहीन असणारे व्यक्ती लाभ मिळू शकणार आहे. योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा बदल केलेला असून आता 100 टक्के अनुदानित तत्त्वावर ही योजना राबविण्यात येत आहे.

 

100 टक्के अनुदानावर जमीन मिळवण्याचा अर्ज येथे करा

 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत किती जमीन मिळते?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान मिळते.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन शंभर टक्के अनुदानावर मिळते.

 

जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान मिळवण्यासाठी येथे अर्ज करा

 

योजनेचा उद्देश:

1. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बेरोजगार व भूमिहीन व्यक्तींना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे.

2. वरील प्रवर्गातील व्यक्तींचा आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने मदत करणे.

3. वरील मजुरांनी शेत जमीन कसून स्वतःच्या कुटुंबाचे पालन पोषण करावे.

4. राज्यातील गरीब असणाऱ्या शेतमजुरांना जमीन वाटप करून त्यांची आर्थिक उन्नती करून देणे

Leave a Comment

error: Content is protected !!