मित्रांनो आपल्या भारत देशात बँक अकाउंट मध्ये पैसे ठेवण्यासंदर्भात अनेक नियम व अटी आहेत. एक व्यक्ती त्याच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा करू शकतो. तसेच त्याच्या खात्यामधून किती रुपये काढू शकतो. किती रुपयांचे व्यवहार करावे जेणेकरून इन्कम टॅक्स ची नोटीस येणार नाही किंवा आयकर भरावा लागणार नाही. अशा प्रकारची अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात येत असतात. परंतु याबाबत पुरेशी माहिती त्यांना नसते त्यामुळे आपण या पोस्टमध्ये Income Tax Rule for Bank Account in Marathi संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जर आपण आपल्या बँक खात्यामध्ये काही विशिष्ट प्रमाणात किंवा त्या मर्यादेच्या खाली व्यवहार करणारा असाल किंवा करत असाल तर तुम्हाला कधीही आयकर विभागाची नोटीस येणार नाही. जर कोणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकत असेल तर किती रुपयापर्यंत आपण ते पैसे आपल्या अकाउंट मध्ये मिळवावे जेणेकरून आपल्याला नोटीस येणार नाही. कारण की पैसे जर दुसऱ्याचे असले आणि जर रक्कम जास्त असली तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे भारतात असलेल्या आहे कर विभागाच्या नियमा संदर्भात पुरेशी माहिती आपल्याला असायला पाहिजे.
एका वर्षात बँकेत किती रुपये पर्यंतचे ट्रांजेक्शन करता येते?
मित्रांनो इन्कम टॅक्स विभागाच्या नियमानुसार एक व्यक्ती एका वर्षामध्ये त्याच्या बँक खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त 10 लाख रुपये पर्यंतचे व्यवहार करू शकतो. मग तुम्ही एका वेळेस दहा लाख रुपये तुमच्या खात्यात जमा करा किंवा टप्प्याटप्प्याने एका वर्षामध्ये दहा लाख जमा करा. परंतु दहा लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम झाल्यास त्याची माहिती आयकर विभागाकडे बँकेद्वारे पाठवण्यात येते.
त्याचप्रमाणे बँकेमधून पैसे विड्रॉल करण्याकरिता सुद्धा लिमिट आहे जसे की तुम्ही एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंतची रक्कम तुमच्या बँक खाते मधून काढू शकतात. नक्की रक्कम तुम्ही एकाच वेळेस काढा किंवा टप्प्याटप्प्याने काढा परंतु एका वर्षांमध्ये दहा लाख रुपये पर्यंतची रक्कम काढू शकतात. यापेक्षा जास्त रक्कम झाल्यास त्याची माहिती आयकर विभागाकडे पाठवण्यात येते.
वेगवेगळ्या बँकेतून ट्रांजेक्शन केले तर नोटीस येते का?
मित्रांनो जर तुमच्याकडे चार बँक खाते असेल आणि तुम्ही चार बँक खात्यातून एका वर्षात दहा लाख रुपये पर्यंतचा व्यवहार केलेला असेल तर तरीसुद्धा तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. मित्रांनो आपल्या बँकेला आपला पॅन कार्ड लिंक असतो. त्यामुळे तुमच्याकडे जेवढे ही सेविंग खाते असतील तेवढ्या सर्वांची एकत्रित रक्कम 10 लाख रुपये पेक्षा जास्त झाल्यास तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.
या परिस्थितीत तुम्हाला आयकर भरावा लागत नाही:
मित्रांनो जर तुमचे एका वर्षातील एकूण डिपॉझिट आणि विड्रॉल व्यवहार हे दहा लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आयकर विभागाची नोटीस येणार नाही. आयकर विभागाच्या नियमानुसार तुम्हाला तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची अट नाही किंवा मर्यादा नाही. तसेच तुमच्याकडे किती सेविंग खाते असावी या संदर्भात सुद्धा कोणत्याही मर्यादा किंवा नाही. परंतु जर तुमचे व्यवहार चालू आर्थिक वर्षामध्ये दहा लाख रुपयांपेक्षा जास्त होत असतील तर त्यामध्ये Income Tax दखल देऊ शकते.
अतिशय सोप्या भाषेत आपण आयकर संदर्भातील तसेच इन्कम टॅक्स नोटीस संदर्भातील माहिती जाणून घेतलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला कळले असेल की आपण आपल्या बँक खात्यात किती रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतो तसेच किती रुपये बँकेत जमा करू शकतो किंवा काढू शकतो.