मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महाराष्ट्र स्टेट बोर्ड दरवर्षी दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा आयोजित करत असते. यावर्षी चे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे अंतिम वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक कसे पाहायचे या संदर्भात माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यातून अनेक लाखो विद्यार्थी यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहे. कोरोना का आल्यापासून दोन वर्ष दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली होती तसेच ऑनलाईन घेण्यात आलेली होती. परंतु आता पूर्वीप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या मार्फत Maharashtra Board HSC, SSC Time Table जाहीर करण्यात आलेली आहे.
राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वेळापत्रकाच्या माध्यमातून योग्य नियोजन करून परीक्षेला सामोरे जाता यावे. आणि परीक्षेमध्ये चांगले यश मिळवता यावे याकरिता Maharashtra State Board Time Table अंतिम वेळापत्रक बोर्डाने जाहीर केलेले आहे.
दहावी आणि बारावीच्या अंतिम वेळापत्रक हे महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ पुणे यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी यावर्षी परीक्षेला सामोरे जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी ते वेळापत्रक लवकरात लवकर डाऊनलोड करून घ्यावे. आणि वेळापत्रकाच्या नुसार योग्य ते नियोजन करून योग्य पद्धतीने आपला अभ्यास सुरू ठेवावा.
टीप: मित्रांनो दहावी आणि बारावीचे वेळापत्रक हे जाहीर झालेले असून विद्यार्थ्यांनी केवळ माहितीकरिता याचा वापर करावा. विद्यार्थ्यांना जे वेळापत्रक त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालय किंवा शिक्षण संस्थेकडून देण्यात येईल तेच वेळापत्रक अंतिम समजावे. प्रसार माध्यमावर व्हायरल होणारे किंवा व्हाट्सअप वर येणारे तसेच कोणतेही इतर वेबसाईटवरील वेळापत्रक विद्यार्थ्यांनी केवळ माहितीकरिता समजावे.