शेतकरी बांधवांनो शासनाच्या मार्फत हरभरा पिकांची खरेदी शासन किमान आधारभूत किमतीने म्हणजेच हमीभावाने करते. शासनाने चालू हंगामासाठी सन 2022 23 करिता जो हमीभाव ठरवून दिलेला असतो, त्या दराने शेतकऱ्यांच्या पिकांची खरेदी करण्याची असते. चालू हंगाम 2022-23 करिता 5330 रू क्विंटल इतक्या दराने शेतकऱ्यांकडून हरभरा या पिकांची खरेदी करण्यात येत आहे. तुम्ही ज्या शेतकऱ्यांना शासनाकडे त्यांचा हरभरा आहे पीक विकायचा आहे त्यांनी Harbhara Hamibhav Nondani करिता सुरुवातीला नोंदणी करायची असते.
जर तुम्हाला सुद्धा तुमच्या हरभऱ्याची किमान आधारभूत किमतीने मार्केटिंग फेडरेशन कडे विक्री करायची असेल तर नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचा हरभरा ऑनलाइन करून घ्यावा. जर तुम्ही तुमच्या हरभरा पिक ऑनलाईन केले तर तुम्हाला बाहेरच्या मार्केटमध्ये कमी भाव असताना सुद्धा चांगल्या दरात शासनाकडे किमान आधारभूत किमतीवर तुमचा हरभरा विकता येतो.
हरभरा ऑनलाइन कसा करायचा?
मित्रांनो हरभरा ऑनलाइन करणे म्हणजे तुमचा हरभऱ्याचे पीक किमान आधारभूत किमतीने मार्केटिंग फेडरेशन कडे म्हणजे शासनाकडे Harbhara Hamibhav मध्ये विकण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे होय. दरवर्षी शासन विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती ठरवत असतात. त्यानुसार शासनाच्या माध्यमातून कोणत्याही पिकांची खरेदी करत असताना त्याच किमतीवर शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केल्या जात असतो.
त्यामुळे तुमच्या शेतातील पीक येण्यापूर्वी तसेच पीक निघत असताना याची नोंदणी सुरू होत असते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही पिकांची नोंदणी करून ते विकू शकतात म्हणजेच ऑनलाइन करू शकतात.
हरभरा ऑनलाइन केल्यास किती रुपये भाव मिळेल?
मित्रांनो यावर्षीचा Harbhara Hamibhav Nondani 2023 अंतर्गत किमान आधारभूत किंमत ही 5330 रुपये प्रति क्विंटल इतकी आहे. म्हणजेच मार्केटिंग फेडरेशन कडे तुम्ही ऑनलाईन करून हरभरा विकल्यास तुम्हाला प्रतिक्विंटल पाच हजार तीनशे तीस रुपये इतका दर मिळणार आहे.
हरभरा ऑनलाइन नोंदणी केव्हा करायची?
मित्रांनो चना या पिकाची ऑनलाईन नोंदणी तुम्हाला 27 फेब्रुवारी 2023 पासून करता येणार आहे. मित्रांनो सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा ही पीक निघालेले असून शेतकरी अत्यंत कमी भावामध्ये खाजगी बाजारामध्ये चना या पिकाची विक्री करत आहे. परंतु मित्रांनो खाजगी बाजारामध्ये चॅनेल अत्यंत कमी भाव मिळत असून शेतकऱ्यांचे शासकीय किमान आधारभूत किमतीनुसार सध्याच्या घडीला प्रत्येक क्विंटल मागे एक हजार रुपयांची नुकसान होत आहे.
परंतु अजूनही शासनाद्वारे हमीभावाने खरेदी सुरू झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु आता Harbhara hamibhav nondani 2023 सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागामार्फत 24 फेब्रुवारी 2023 ला हरभरा या पिकाची हमीभावाने खरेदी सुरू करण्यासाठी परिपत्रक काढून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेली आहे.
त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या विचारणा लक्षात घेता महत्त्वाचा असा निर्णय सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हरभरा या पिकांची Harbhara hamibhav nondani 2023 खरेदी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून शासन दरबारी हरभऱ्याची विक्री करण्यात येणार आहे.
हमीभावामध्ये हरभऱ्याची विक्री कुठे करायची?
शेतकऱ्यांच्या मनात हमीभाव संदर्भात असणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोंदणी कुठे करायची आणि हरभऱ्याची हमीभावाने विक्री कशी करायची व कुठे करायची.
शासनाकडून पणन महासंघासह आठ विविध एजन्सीद्वारे शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केली जाणार आहे. तसेच आता शासनाने जाहीर केलेल्या पत्राद्वारे सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. सोमवारपासून जिल्हा मार्केटिंग कार्यालयात शासनाचे आदेश पोहोचल्यानंतर सातही खरेदी केंद्रावर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारपासून तालुक्यातील खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करायची आहे.
देशातील कापूस दरवाढीसाठी पोषक स्थिती आहे, तरीसुद्धा कापसाचे बाजार भाव दबावात का? जाणून घ्या कारण
हमीभाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
शेतकरी बांधवांना जर तुम्हाला तुमचा हरभरा किमान आधारभूत किमतीने विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. सातबारा उतारा
2. आधार कार्ड
3. बँक पासबुक
4. सातबारावर ऑनलाईन पीक पेरा याची नोंद असावी
अशा प्रकारची हरभरा हमीभावा संदर्भातील नोंदणी प्रक्रिया संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती महत्त्वाची असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.