मित्रांनो ग्रामपंचायत ही पंचायत राज व्यवस्थेमधील महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या योजनांकरिता राज्य शासन तसेच केंद्र शासन वेळोवेळी निधी मंजूर करत असतो. राज्य शासनाच्या मार्फत तसेच केंद्र शासनाच्या मार्फत ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात. मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये राहणाऱ्या गावातील नागरिकांना सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध व्हाव्या. तसेच विविध योजनांच्या माध्यमातून गावातील लोकांचे जीवन सुखकर व्हावे याकरिता अनेक योजना ग्रामपंचायत मध्ये सुरू असतात. या लेखात आपण Gram Panchayat Yojana Yadi संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.
त्यामुळे ग्रामपंचायतीला विविध योजनांसाठी भरमसाठ निधी प्राप्त होत असतो. परंतु गावातील नागरिकांना त्यांच्या गावात विविध विकास कामांसाठी योजने करिता किती निधी आलेला आहे याची माहिती नसते. परंतु मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये जेवढे ही योजना राबविण्यात येत असतात त्यांची माहिती गावातील व्यक्तींना व्हावी यासाठी केंद्र शासनाने नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्याच्या माध्यमातून आपण ऑनलाइन ग्रामपंचायत मधील योजनांची माहिती मिळवू शकतो.
मित्रांनो गावातील ग्रामपंचायत मधील नागरिकांना दिवाबत्तीची सोय व्हावी तसेच त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा तसेच गावामध्ये चांगले व दर्जेदार रस्ते व्हावे. तसेच गाव स्वच्छ राहावे याकरिता तसेच इतरही बाबींकरिता अनेक प्रकारच्या Gram Panchayat Yojana वेळोवेळी थेट ग्रामपंचायत मध्ये केंद्र सरकार राबवित असते. तसेच महाराष्ट्र शासन सुद्धा राज्यस्तरावर विविध प्रकारच्या योजना ग्रामपंचायतीसाठी वेळोवेळी सुरू करत असते. त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये दरवर्षी अनेक प्रकारच्या योजना आपल्याला नवीन पाहायला मिळतात.
ग्रामपंचायत योजनांची यादी अशी पहा ऑनलाईन
मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र शासनामार्फत तसेच केंद्र शासनामार्फत राबवलेल्या विविध योजनांची माहिती तसेच त्या योजनांची सविस्तर यादी पाहण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध झालेली आहे. बहुतांशी योजना या ग्रामपंचायत मध्ये नरेगाच्या मार्फत राबविण्यात येत असतात. मित्रांनो ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने नरेगा योजना सुरू केलेली होती. या मनरेगा ॲक्टनुसार ग्रामपंचायत मधील अनेक योजना नरेगा नुसार राबविण्यात येत असतात.
जर तुम्हाला सुद्धा तुमच्या ग्रामपंचायत मधील योजनांची यादी पाहिजे असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.
1. ग्रामपंचायत मध्ये यापूर्वी राबवलेल्या तसेच सध्या सुरू असलेल्या योजनांची माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम नरेगाचे अधिकृत पोर्टल ओपन करा.
2. आता या ठिकाणी तुम्हाला तुमची ग्रामपंचायत तसेच तुमचा तालुका व तुमच्या जिल्हा निवडायचा आहे.
3. आता तुम्हाला ज्या वर्षीच्या योजनांची माहिती पाहिजे आहे ते वर्ष या ठिकाणी निवडून घ्या.
4. जर तुम्हाला चालू वर्ष 2023-24 ची माहिती पाहिजे असेल तर हे वर्ष त्या ठिकाणी निवडा.
5. आता शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करून तुमच्यासमोर तुमच्या गावातील योजनांची संपूर्ण यादी ओपन झालेली असेल.
6. ओपन झालेल्या यादीमध्ये कोणती योजना राबविण्यात आलेली आहे, त्याकरिता किती रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. व त्या योजनेचे काम कुठपर्यंत आलेले आहे, याची संपूर्ण माहिती असेल.
तुमच्या गावातील सरपंच व उपसरपंच तसेच ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो? ते येथे पहा
मित्रांनो अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने ग्रामपंचायत मध्ये राबविलेल्या सर्व Grampanchayat Yojana Maharashtra yadi पाहू शकतो. त्याचप्रमाणे कोणती योजना केव्हा सुरू झालेली होती तसेच त्या योजनेचे काम केव्हा संपलेले आहे. व त्याकरिता मंजूर झालेला निधी हे सुद्धा आपण चेक करू शकतो.
ग्रामपंचायत योजनांची यादी पाहण्याची लिंक
मित्रांनो वरील लिंक वरून तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील सर्व योजनांची यादी पाहू शकतात.