गाई साठी 70 हजार तर म्हशीसाठी 80 हजार मिळणार; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे व पात्रता | Gay Mhais Anudan Yojana

मित्रांनो राज्यात पशुसंवर्धन व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच पशुसंवर्धना बरोबर राज्यातील दूध उत्पादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दुधाळ गाई म्हशींचे गट खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत गाई साठी 70 हजार तर म्हशीसाठी ८० हजार अनुदान देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा, या Gay Mhais Yojana चा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, तसेच इतर सर्व तपशील आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधाळ गाई म्हशी योजनेच्या गट वाटप करिता वितरित करण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. आता शेतकऱ्यांना प्रति दुधाळ गाई साठी 70 हजार तर प्रति दुधाळ म्हशीसाठी 80 हजार रुपये खरेदी किंमत देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात पशुपालन अंतर्गत दुग्ध व्यवसाय करू इच्छिणाऱ्या पशुपालकांसाठी ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

 

मित्रांनो राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप करणारी महत्त्वपूर्ण अशी योजना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय या दोन प्रकारांमध्ये राबविण्यात येत असते. योजनेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना या घटकांतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असतात. या Gay Mhais Anudan Yojana Maharashtra अंतर्गत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ गाई म्हशीचे गट याकरिता लक्षांक ठरवून देण्यात आलेला असतो. प्रत्येक जिल्ह्याच्या लक्षांक नुसार त्या जिल्ह्याला दुधाळ गाई म्हशीच्या गटाचे वाटप करण्यात येत असते.

 

महाराष्ट्र शासनाने Dudhal Gay Mhais Palan Yojana करिता जाहीर केलेली नवीन खरेदी किंमत ही सन 2023 24 पासून लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच आता या योजनेअंतर्गत इथून पुढे गाईसाठी 70 हजार तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त दुधाळ जनावरांची संख्या वाढवून राज्यातील दूध उत्पादनाचे प्रमाण वाढावे हा राज्य शासनाच्या या मागील महत्त्वाचा उद्देश आहे.

 

अर्ज कोठे व कधी करायचा इथे क्लिक करून पहा

 

दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो?

दुधाळ जनावरांचे गट वाटप करणारी योजना महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत राबविण्यात येत असून अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदार अर्ज करून लाभ मिळवू शकतात.

 

अर्ज कोठे व कधी करायचा इथे क्लिक करून पहा

 

मित्रांनो वरील लिंक वरून तुम्ही दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप योजना अंतर्गत गाई साठी 70 हजार अनुदान तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान करिता अर्ज करू शकतात. तसेच या योजनेच्या अटी व शर्ती तसेच आवश्यक सर्व पात्रता व कागदपत्रांची माहिती वरील लिंक वर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन योजनेच्या अंतर्गत गाई व म्हशीचे गट वाटप करण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत खरेदी किंमतीमध्ये केलेल्या मोठ्या प्रमाणातील वाढीमुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!