शेतकरी मित्रांनो सातबारावर पिकांची नोंद करण्याच्या पद्धतीत महत्वपूर्ण बदल! शासन निर्णय जाहीर | Epeek Pahani Changes

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात सन 2021 पासून ई पिक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या E Peek Pahani अंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या सातबारावर त्यांच्या पिकांची नोंद स्वतः करायची असते. शेतकऱ्यांनी चालू वर्षांमध्ये चालू हंगामामध्ये कोणत्या पिकांची लागवड त्यांच्या शेतामध्ये केलेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात असलेला फळबाग व शेतकऱ्यांच्या बांधावर असलेली झाडे व इतर सर्व तपशील ची नोंद शेतकऱ्यांना स्वतःच्या सातबारावर स्वतः ही Epeek Pahani च्या माध्यमातून करायची असते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून या सातबारावर नोंदी करण्याच्या पद्धतीमध्ये महत्त्वपूर्ण असा बदल केलेला आहे. हे Epeek Pahani Changes आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये Epeek Pahani या मोबाईल ॲप्लिकेशन वरून त्या हंगामातील पिकांची नोंद करायची असते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जलसिंचनाचा स्त्रोत तसेच पिकाचे क्षेत्र, प्रकार तसेच कायम पड व शेताच्या बांधावरील झाडे तसेच शेतातील पायाभूत सुविधा यांच्या सुद्धा नोंदी करावे लागतील. या नोंदी करत असताना संबंधित शेतकऱ्यांना जिओ टॅगिंग केलेले फोटो सुद्धा अपलोड करावे लागतील.

पी एम किसान 13 वा हप्ता या तारखेला जमा होणार; अधिकृत तारीख जाहीर

 

ई पीक पाहणी मध्ये करण्यात आलेल्या सुधारणा Changes in E Peek Pahani:-

1. जर शेतकऱ्यांनी सातबारावर पिकांचे नोंदी करत असताना काही चुका केलेला असतील, किंवा चुकीची नोंद झालेली असेल तर 48 तासाच्या आत शेतकऱ्यांना त्या नोंदी दुरुस्त करता येतात.

2. जर या नोंदी शेतकऱ्यांनी वेळेत दुरुस्त केल्या नाही तर त्याची नोंद नमुना 12 मध्ये लागणार आहे.

3. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात चुकीच्या नोंदी आढळल्यास तर त्यांच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कार्यवाही देखील करण्यात येईल.

4. जर शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची नोंद ई फिक पाहणीच्या माध्यमातून केली नाही तर संबंधित तलाठ्याला या नोंदी कराव्या लागतील.

5. जर शेतकऱ्यांकडून नोंदी करत असताना काही चूक झालेली असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करण्याकरिता शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये अर्ज करावा लागेल. जर तलाठी कार्यालयामधून काही नोंदी दुरुस्त करायचे असतील तर त्याबाबत तलाठी यांना मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.

6. शेतकऱ्यांनी त्यांच्या सातबारा वरती Epeek Pahani च्या माध्यमातून केलेल्या सर्व नोंदी जोपर्यंत उलट सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्या नोंदी सर्व शासकीय योजना त्यामध्ये पीक विमा, पीक कर्ज व इतर योजनांकरिता वैद्य मानण्यात येणार आहे.

7. शेतकऱ्यांनी केलेली चालू वर्षीची Epeek Pahani 03 वर्षाकरिता ऑनलाइन उपलब्ध ठेवण्यात येणार आहे तसेच पाच वर्षाकरिता संग्रहित करून ठेवण्यात येणार आहे.

8. ई पिक पाहण्याची नोंदणी शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजनेच्या अंमलबजावणी करिता इतर विभागांना दिल्या जाऊ शकेल.

या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे 675 कोटी रुपये वितरित करण्यासाठी नवीन शासन निर्णय जाहीर

अशा प्रकारची तरतूद या ई पीक पाहणीच्या जीआर मध्ये करण्यात आलेली आहे.

मित्रांनो अशा प्रकारच्या अनेक तरतुदी अनेक सुधारणा या नवीन ई पिक पाहणीच्या धोरणामध्ये शासनाच्या वतीने नवीन एक शासन निर्णय काढून करण्यात आलेला आहे.

 

ई पीक पाहणी सुधारणा शासन निर्णय येथे पहा

 

Epeek Pahani महत्वपूर्ण बदल संदर्भातली ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!