या जिल्ह्यातील 833 लोकांची नवीन घरकुल यादी जाहीर; लगेच यादीत तुमचे नाव पहा; आज जाहीर झाली ही नवीन लिस्ट | Dhangar Gharhkul Yadi 2023

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या समाजाकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. राज्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजातील गरीब बांधवांना त्यांना स्वतःचे पक्के घर मिळावे या दृष्टीने अनेक योजना राज्य तसेच केंद्र शासन राबवित आहे. राज्यात राहणाऱ्या धनगर समाजातील बांधवांकरिता महत्त्वपूर्ण अशी घरकुल योजना राबविण्यात आलेली आहे. तसेच आता या धनगर समाजाकरिता राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेअंतर्गत नवीन Dhangar Gharhkul Yadi 2023 प्रकाशित झालेली आहे. या यादीत 833 लोकांचा समावेश करण्यात आलेला असून या पोस्टमध्ये आपण ही यादी तुम्हाला कशी पहायची याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

कोणत्या जिल्ह्याची नवीन घरकुल यादी जाहीर झाली? New Gharkul List

मित्रांनो लातूर जिल्ह्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील म्हणजेच धनगर समाजातील एकूण 833 वैयक्तिक लाभार्थ्यांची नवीन घरकुल यादी प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे आता या Gharkul Yadi मध्ये नाव असणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. जर तुम्हाला ही Gharkul List हवी असेल तर याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मिळाले नाही? तुम्हाला घरकुलाच्या यादीतून वगळले! अशी करा तक्रार; लगेच घरकुल मिळेल

घरकुल योजनेसाठी निधी वितरीत करण्यास मान्यता

लातूर जिल्ह्यातील धनगर समाजांकरिता राबविण्यात येणाऱ्या या घरकुल योजनेअंतर्गत यादीत नाव आलेल्या 833 वैयक्तिक लाभार्थ्यांना एकूण रु. 9,99,60,000/- निधी इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच वरील जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 9 कोटी 99 लाख 60 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात येत आहे.

ओबीसींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना; नवीन घरकुल योजना सुरू

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना हा निधी महाराष्ट्र राज्य इतर मागास व बहुजन कल्याण संचालनालय संचालक यांच्यामार्फत वितरित करण्यात येणार आहे. हा निधी Public Financial Management System-PFMS द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करण्यात येईल.

घरकुलाच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार हा निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

महत्वाचं अपडेट नक्की पहा: रेशन कार्ड धारकांना आता रेशन ऐवजी पैसे मिळणार! नवीन निर्णय जाहीर; कोण असेल लाभार्थी, किती रुपये मिळणार संपूर्ण माहिती

833 लाभार्थ्यांची नवीन घरकुल यादी जाहीर

लातूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या 833 लोकांची नवीन घरकुल यादी जाहीर करण्यात आलेली असून ही यादी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याद्या आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे, ती तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये हवी असेल तर खालील लिंक चा वापर करावा.

 

833 लाभार्थ्यांची नवीन घरकूल यादी येथे पहा

 

आजच्या पोस्टमध्ये आपण लातूर जिल्ह्याकरिता धनगर समाज बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेची नवीन यादी संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती इतरांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!