वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा हक्क किती असतो? महत्वाची माहिती! जाणून घ्या काय सांगतो कायदा | Daughters Rights On Fathers Property

मित्रांनो आजकाल संपत्ती तसेच मालमत्ता प्रत्येकाला हवी असते. आणि खास करून आपल्या वडिलांची संपत्ती तसेच मालमत्ता जीचे आपण वारस असतो, ती संपत्ती तर कोणालाही सोडावीशी वाटत नाही. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीबाबत अनेक भावाभावामध्ये तसेच भाऊ बहिणीमध्ये वाद निर्माण होतात. वडिलांनी ते हयात असताना त्यांच्या संपत्तीचे वाटप न केल्यास पुढे चालून अनेक प्रकारचे भांडण तंटे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो कायद्यानुसार कोणत्या सभासदाला तसेच वारसाला किती अधिकार असतो हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. या पोस्टमध्ये Daughters Rights On Fathers Property आपण वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा किती हक्क असतो याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वडिलांना असणाऱ्या मुलांचा जेवढा अधिकार असतो, तेवढाच अधिकार वडिलांच्या संपत्तीवर त्यांच्या मुलींचा सुद्धा असतो. परंतु कायद्यामध्ये अशा अनेक प्रावधान आहे ज्यामध्ये जर ती मुलगी किंवा मुलगा बसत असेल तर त्यांना संपत्तीचा अधिकार राहत नाही, किंवा कमी राहतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना संपत्ती बाबतची ही महत्त्वाची माहिती माहित असायला पाहिजे. जेणेकरून आपल्या भावा बहिणी मध्ये कोणत्याही प्रकारची भांडण तंटे संपत्तीसाठी होणार नाही.

 

वडील हयात असताना मुलांना तसेच मुलींना वडिलांच्या संपत्तीवर असलेला अधिकार तसेच वडील हयात नसताना असलेला अधिकार या सर्व बाबी समजण्यास थोड्या किचकट आहेत. परंतु या बाबीचे पुरेसे ज्ञान आपल्याला नसल्यास समोरचा व्यक्ती आपली फसवणूक करू शकतो. त्यामुळे जर आपल्याला वडिलांच्या संपत्ती बाबत कायदा काय सांगतो हे माहीत असेल तर कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही.

 

वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलीचा हक्क Daughter’s right to ancestral property

तसे पाहिल्यास वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा आणि मुलांचा समान हक्क असतो. परंतु भारत देशात मुलींना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार मिळत नाही, कारण की मुलीचे लग्न लावून तिला सासरी पाठवण्यात येते. त्यामुळे वडिलांची संपत्ती वडिल मुलांना देतात. परंतु वरील हयात असताना त्यांनी मुलाच्या नावावर संपत्ती केली नाही तर वडील हयात नसताना ही संपत्ती मुलाला जर पाहिजे असेल तर त्याकरिता त्या मुलीची म्हणजेच त्या मुलाच्या बहिणीची सही तसेच परवानगी असावी लागते.

 

वडिलांच्या मालमत्तेवरती मुलीचा किती हक्क असतो? या संदर्भातील कायदा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

जर तुमच्या परिवारात एक मुलगा आणि एक मुलगी असेल आणि कुटुंबातील जमीन नावावर असलेला तुमचा पालक हयात नसेल तर त्याच्या नावावर असलेली जमीन दोघांना समान वाटप करण्यात येते. जर वडिलांच्या नावावर चार एकर जमीन असेल तर बहिणीला दोन एकर आणि भावाला दोन एकर अशी समान वाटणी होते.

 

या परिस्थितीत वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा कोणताही अधिकार नसतो. इथे क्लिक करुन जाणुन घ्या संपूर्ण माहिती

 

संपत्तीच्या वाटपाबाबत असणारी कायदे:

मित्रांनो आपल्या भारत देशात संपत्तीच्या वाटपासाठी अनेक कायदे आहेत. हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 तसेच वेगवेगळ्या समाजाकरिता तसेच धर्मातील लोकांकरिता वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत. तसेच जमीन व महसूल विभागाचा सुद्धा जमिनीच्या वाटपा संबंधित कायदा आहे. मुस्लिम लोकांसाठी वेगळा कायदा आहे तसेच ख्रिश्चन समाजातील व्यक्तींसाठी सुद्धा वेगळा कायदा आहे.

 

वडिलांच्या मालमत्तेवरती मुलीचा किती हक्क असतो? या संदर्भातील कायदा पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आपल्या वडीलाकडे दोन प्रकारची मालमत्ता असू शकते त्यातील पहिली मालमत्ता म्हणजे तुमच्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झालेली मालमत्ता. म्हणजेच तुमच्या आजोबाची तुमच्या वडिलांना मिळालेली संपत्ती. आणि मालमत्तेचा दुसरा प्रकार म्हणजे वडिलांनी स्वतः कमावलेली मालमत्ता. पिढ्या न पिढ्या हस्तांतरित होणारी मालमत्ता म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता असते.

Leave a Comment

error: Content is protected !!