मित्रांनो मुलींना संपत्तीची वाटण्याबाबत अनेक प्रकारचे कायदे या देशात अस्तित्वात आहेत. खास करून वडिलांच्या संपत्तीवर मुलीच्या अधिकाराबाबत अनेक प्रकारचे भांडण तसेच तंटे आपल्याला पाहायला मिळते. सर्वसामान्य लोकांना वडिलांच्या संपत्तीच्या वाटपाचे अधिकाराबाबत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे मुलींना संपत्तीच्या वाटेबाबत असणारा अधिकार आपल्याला माहीत असायला पाहिजे. यापूर्वीच्या पोस्टमध्ये आपण मुलींना असणारा वडिलोपार्जित संपत्ती मध्ये अधिकार जाणून घेतलेला आहे.
आजच्या या पोस्टमध्ये आपण कोणत्या परिस्थितीमध्ये वडिलोपार्जित संपत्ती मध्ये मुलीचा अधिकार नसतो यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो काही अशा अवस्था किंवा सावधान आहेत, ज्यामध्ये ती मुलगी बसत असल्यास तिला संपत्ती मिळवण्याचा कोणताही अधिकार नसतो. याबाबत विस्तृत माहिती आपण खाली दिलेली आहे.
खालील परिस्थितीत मुलींना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार मिळत नाही:
मित्रांनो संपत्तीच्या वाटपावर सर्वात महत्त्वाचा म्हणजे वडिलांकडून त्यांच्या मुलाला प्राप्त होणारी मालमत्ता म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता असते. आणि दुसरी मालमत्ता म्हणजे वडिलांनी स्वतः कमावलेले मालमत्ता असते. जर समजा एखाद्या मुलीने तिच्या वारसा हक्काचा त्याग केलेला असेल तर तिला संपत्ती मिळवण्याचा अधिकार नसतो.
जर त्या मुलीने त्याग पत्र दिलेले असेल तर वडिलांच्या संपत्तीत तिला कोणताही वाटा मिळणार नाही. जीव वडिलांनी स्वतः पैशाने कमवून मालमत्ता विकत घेतलेली आहे अशा मालमत्तेवर मुलींना हक्क सांगता येत नाही. त्याचप्रमाणे जर वडिलांनी त्यांच्या मृत्युपत्र मध्ये मुलांची नावे टाकलेली असेल आणि मुलीचे नाव समाविष्ट नसेल तर मुलीला संपत्तीच्या वाटपामध्ये हक्क सांगता येत नाही.
जर वडिलांनी मुलांच्या नावावर मृत्युपत्र लिहून दिले तर मुलीला वडील हयात असताना वडिलांनी त्यात नाव समाविष्ट न केल्यामुळे हक्क मिळत नाही. वडिलांनी स्वतः कमावलेली प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता ही त्यांची स्वतःची मालमत्ता असते त्यामुळे ती मालमत्ता ती कोणालाही देऊ शकतात.
थोडक्यात सांगायचे झाल्यास वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलींचा अधिकार असतो. परंतु वडिलांनी स्वतः कमावलेल्या संपत्तीवर जर मुलीला समाविष्ट केलेले नसेल तर मुलगी कोर्टात जाऊन सुद्धा हक्क मिळवू शकत नाही. परंतु मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर मुलीला त्यांच्यामध्ये हक्क मागता येतो.
वरील प्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर मुलींना असणारा हक्क आपण जाणून घेतलेला आहे. मुलींना वडिलांच्या संपत्ती मध्ये कोणत्या वेळेस हक्क नसतो याची सुद्धा माहिती आपण जाणून घेतलेली आहे. अशाप्रकारे कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या संपत्तीवर हक्क मागता येते.