दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये कर्ज असे मिळवा | Dairy Loan Apply

मित्रांनो जर तुम्ही दुग्ध व्यवसाय सुरू करणार असाल आणि तुमच्याकडे पुरेसे भांडवल तसेच पैसा उपलब्ध नसेल तर नाबार्ड बँकेच्या मार्फत तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील कोणताही पशुपालक शेतकरी या योजनेअंतर्गत स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळवू शकतो.

 

नाबार्ड बँकेच्या मार्फत सुरू करण्यात आलेला हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून या योजनेअंतर्गत राज्यात जास्तीत जास्त दुग्ध व्यवसायाचे प्रमाण वाढावे हा उद्देश आहे. दुग्ध व्यवसाय हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय असून दिवसेंदिवस या व्यवसायाची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांना हा व्यवसाय सुरू करून जास्तीत जास्त आर्थिक उन्नती साधता यावी यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

आवश्यक कागदपत्रे:

जर तुम्हाला दुग्ध व्यवसायासाठी कर्ज हवे असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. अर्जदाराचे आधार कार्ड

2. दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट

3. बँक पासबुक

4. जातीचा दाखला

5. पॅन कार्ड

6. व्यवसाय बाबत ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र

7. दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र

वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला दुग्ध व्यवसाय अंतर्गत लोन मिळवण्यासाठी आवश्यक असून ही कागदपत्रे असल्यास तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकतात.

 

अर्ज कसा करायचा? How to Apply for Dairy Loan Scheme

तुम्हाला दुग्ध व्यवसायासाठी जर कर्ज हवे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज सादर करू शकतात. नाबार्ड बँकेच्या मार्फत अनेक प्रकारची कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून दुग्ध व्यवसायासाठी अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. वर दर्शवलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला पीडीएफ मध्ये ऑनलाइन अपलोड करावी लागेल. अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

दूध व्यवसायासाठी 25 लाख रुपये कर्ज मिळण्यासाठी येथे अर्ज करा

 

वरील लिंक वरून तुम्ही दुग्ध व्यवसायासाठी ऑनलाईन पद्धतीने कर्ज मागणी करू शकतात. तुमची मागणी ग्राह्य झाल्यानंतर तुम्हाला बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!