100 टक्के अनुदानावर मोफत शेत जमीन मिळवण्यासाठी नवीन अर्ज सुरू; भूमिहीन व शेतमजुरांना मोफत शेत जमिनीचे वाटप सुरू | Dadasaheb Gaykwad Sabalikaran Yojana

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व्यक्तींना 100 टक्के अनुदानावर शेत जमिनीचे वाटप करण्यात येत असते. महाराष्ट्र शासनाने सन 2023 करिता ही योजना सुरू केलेली असून या Dadasaheb Gaykwad Sabalikaran Yojana Maharashtra अंतर्गत अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत.

 

राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील अनेक व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील आहेत, हे व्यक्ती शेतमजूर असून लोकांच्या शेतामध्ये मजुरी करतात. त्यामुळे अशा मजुरांना शासनाच्या मार्फत शंभर टक्के अनुदानावर शेत जमिनीचे वाटप करण्यात येत असते. जमीन खरेदीला शंभर टक्के अनुदान देणारी ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील अनुसूचित जातीचे भूमिहीन व्यक्ती लाभ मिळवू शकतात.

 

या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया:

या योजनेअंतर्गत 18 ते 60 वयोगटातील त्याच गावचे रहिवासी असलेले व्यक्ती लाभार्थी म्हणून निवडण्यात येतील. जर त्या गावांमध्ये लाभार्थी उपलब्ध नसेल तर बाजूच्या गावातील लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. जर बाजूच्या गावातही लाभार्थी न सापडल्यास तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्यांचा विचार करून त्यांना जमिनीचे वाटप करण्यात येईल. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून देण्यात आलेली आहे, ते याबाबत निर्णय घेणार आहे.

या योजनेअंतर्गत परितक्त्या महिला तसेच विधवा महिला यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीतील बांधवांना आता शेतमजुरीच्या भरोशावर राहण्याची आवश्यकता नसून स्वतःची जमीन करण्याची संधी मिळणार आहे. jamin kharedi anudan yojna maharashtra

 

शंभर टक्के अनुदानावर जमीन मिळवण्याचा अर्ज कसा व कुठे करायचा?

मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जर तुम्ही शंभर टक्के अनुदानावर जमीन मिळू इच्छित असाल तर करावयाचा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.

 

APPLICATION PDF(अर्जाचा नमुना) येथे पहा

 

योजनेअंतर्गत शेतजमीन मिळवण्याबरोबरच शेत जमीन विक्री करणाऱ्या शेतजमीन मालकाचे सुद्धा अर्ज स्वीकारण्यात येत असतात. योजने अंतर्गत इच्छुक असणाऱ्या लाभार्थ्यांनी शेत जमीन विक्रीचे प्रस्ताव तसेच शेत जमीन खरेदी करण्याकरिता करावयाचा अर्जाचा नमुना हा समाज कल्याण विभाग यांच्याकडे जमा करायचा आहे.

 

जमीन खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान वितरित करणाऱ्या या योजनेअंतर्गत काही अडचण असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही समाज कल्याण विभाग या ठिकाणी जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात. मित्रांनो अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना नव संजीवनी देणारी ही एक महत्त्वाची योजना राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येत आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

1. योजनेअंतर्गत करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज

2. आवश्यक सर्व शपथपत्रे

3. आवश्यक सर्व ना हरकत दाखले

4. तलाठी प्रमाणपत्र

5. जमिनीबाबत सर्च रिपोर्ट

6. इतर आवश्यक कागदपत्रे

जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असाल तर वरील लिंक वरून अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवा किंवा त्याची प्रिंट काढा आणि अर्ज जमा करा.

Leave a Comment

error: Content is protected !!