कर्ज माफी योजनेसाठी 900 कोटी रुपये मंजूर; नवीन याद्या जाहीर, रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात | Crop Loan Wavier New List

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या कर्जमाफी योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांच्या नवनवीन याद्या या प्रकाशित होत आहेत. कर्जमाफी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी तसेच योजनेची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी शासन वेळोवेळी निधी मंजूर करत आहे. नुकताच शासनाने 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, या Crop Loan Wavier विषयी माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेऊया.

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजने पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 900 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केलेला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना या crop loan wavier list maharashtra नवीन यादीत समाविष्ट करण्यात येणार असून जास्तीत जास्त राज्यातील कर्ज असलेले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवू शकणार आहे.

सर्व जिल्ह्यांच्या कर्जमाफी याद्या येथे पहा

कर्जमाफी योजना याद्या जाहीर

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजनेच्या नियमित कर्ज माफी या घटकांतर्गत शेतकऱ्यांना पन्नास हजार वितरण करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व गावातील वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करून त्यांना 50000 प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येत आहे.

कर्जमाफी योजनेच्या 900 कोटी वितरणाच्या नवीन याद्या येथे पहा

 

आतापर्यंत सर्व जिल्ह्यांच्या 03 याद्या प्रकाशित:

मित्रांनो राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महा आयटी पोर्टलच्या माध्यमातून ही कर्जमाफी योजना राबविण्यात येत असून सुरुवातीला गावातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात येत असतात. त्यानंतर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपयांपर्यंतची प्रोत्साहन रक्कम महाआयटीच्या मार्फत वितरण करण्यात येत असते.

 

जिल्हा निहाय कर्ज माफी यादी येथे पहा

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत हजारो कोटी रुपये या कर्जमाफी योजने करिता खर्च केलेल्या असून अजूनही अतिरिक्त निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या गावातील जे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, परंतु पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना नवीन यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!