मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे वाटप करण्यासाठी पिक विमा कंपनीकडे निधी उपलब्ध करून दिलेला होता. त्यामुळे अनेक शेतकरी जे पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा मिळवण्यास पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा यादी कंपनीने 27 हजार हेक्टरी Crop Insurance मंजूर केलेला आहे. पिक विमा तसेच नुकसान भरपाई संदर्भात महत्त्वाचा अपडेट आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून एक रुपयाची ही पीक यावर्षी मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकरिता नुकसान भरपाई जाहीर केली होती. महाराष्ट्र शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा जाहीर केलेल्या होत्या. राज्य सरकारने शेतकऱ्यांना Nuksan Bharpai चे वाटप करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी जवळपास 5000 कोटी पेक्षा अधिक निधी नुकसान भरपाई म्हणून वाटप केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने या वर्षी शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या रकमेपेक्षा दुप्पट दराने निधी वितरित केले केला आहे. राज्य शासनाने जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये तर बागायत शेतकऱ्यांना हेक्टरी 27 हजार तर फळबाग लागवड असणाऱ्या शेतकऱ्यांना 36 हजार रुपये हेक्टरी nuksan bharpai nidhi हा वितरित केलेला आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे. या रकमेच्या याद्या सुद्धा शासनाने उपलब्ध करून दिलेले आहे. जिल्ह्याच्या वेबसाईटवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या या प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे. आदिवासी नुकसान भरपाईच्या याद्या आम्ही तुम्हाला यापूर्वीच्या पोस्टमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे.
27 हजार हेक्टरी सरसकट पिक विमा यादी येथे चेक करा
724 कोटी पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा Pik Vima Vitarit:
शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची वाटप करण्यासाठी राज्य शासनाने राज्य शासनाच्या हिश्यावर येणारी व पिक विमा कंपनीत वितरित करावयाची रक्कम ही पिक विमा कंपनीस मंजूर केलेली आहे. राज्य शासनाने पिक विमा अनुदानासाठी 724 कोटी रक्कम मंजूर करून वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता उर्वरित जे शेतकरी पिक विमा च्या लाभांपासून वंचित होते, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
त्याचबरोबर ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून पर्यंत पिक विमा कंपन्या द्वारे कोणत्याही प्रकारचा निधी वितरित करण्यात आलेला नाही. अशा शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्याची निर्देश शासनाने वेळोवेळी दिलेली आहे. राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना ज्या भागांमध्ये पन्नास टक्के पेक्षा अधिक नुकसान भरपाई आढळून आलेली आहे अशा ठिकाणी पिक विम्याचे वाटप झालेले आहे.