शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नुकसान भरपाईच्या याद्या तुमच्या मोबाईल मध्ये मिळवायचे असतील तर खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पाहू शकतात. तसेच या Crop Insurance List तुम्ही डाऊनलोड करू शकतात.
राज्यात अनेक शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली असून ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या यादी आता प्रकाशित झालेले आहेत. त्या पाहण्याची संपूर्ण प्रोसेस आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे.
नुकसान भरपाई याद्या खालील प्रमाणे पहा:
1. मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील याद्या तसेच जिल्ह्याच्या याद्या पाहायच्या असतील तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये गुगल ओपन करा.
2. आता तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या याद्या पाहायचे आहे त्या जिल्ह्याचे नाव टाईप करा आणि त्याच्यासमोर .gov.in किंवा nic.in हे टाकून सर्च करा.
3. आता तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
4. सर्वप्रथम या वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला भाषा निवडण्याचा ऑप्शन दिसेल.
5. त्यामध्ये मराठी या नावावर क्लिक करून मराठी भाषा निवडून घ्या.
6. आता तुम्हाला मेन मेनू या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
7. आता तुम्हाला या ठिकाणी दस्तऐवज किंवा घोषणा हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
8. आता तुमच्यासमोर सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटपाच्या याद्या किंवा नुकसान भरपाई याद्या असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
9. आता तुम्ही या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये ही यादी डाऊनलोड झालेली असेल.
10. यादी तुम्ही गुगल क्रोम ब्राऊज्याच्या डाउनलोड या पर्यायावर जाऊन पीडीएफ स्वरूपात पाहू शकतात. किंवा मोबाईल, कम्प्युटरच्या फाईल मॅनेजर मध्ये जाऊन ही पीडीएफ यादी पाहू शकतात.
अशाप्रकारे आपण अगदी सहजपणे आपल्या गावातील तसेच जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या याद्या तसेच निधी वितरणाच्या याद्या पाहू शकतात.