मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मुळे अनेक शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते. त्यामुळे राज्य सरकारने वितरित केलेल्या निधी हा टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्याला वाटप सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी मिळालेला असून अनेक जिल्ह्यांची वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण एका नवीन जिल्ह्यातील Crop Damage Compensation Nidhi Vitarit अपडेट आपल्याकडे आलेले आहे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यातील परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाई ची 58 कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली असून जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची झालेली नुकसान या भरपाईमुळे भरून निघणार आहे.
अतिवृष्टीचे 58 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळाले?
मित्रांनो परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका तसेच पाथरी तालुका व परभणी तालुका या तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान बाधित असलेल्या शेतकऱ्यांना ह्या 58 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप सुरू आहे. जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 58 कोटी 38 लाख रुपये इतके नुकसान भरपाईचे अनुदान जमा करण्यात आलेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांना ही रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या शेतकऱ्यांना 27 हजार हेक्टरी सरसकट पिक विमा मंजूर; लगेच यादीत आपले नाव चेक करा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले होते नुकसान:
मित्रांनो सन 2022 मध्ये राज्यात सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झालेला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सेलू तसेच पाथरी व पूर्णा व परभणी या चार तालुक्यात 92 हजार 737 शेतकरी हे बाधित झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील 56 हजार 175 हेक्टर वरील जिरायती पिकांची 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले होते. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नुकसान भरपाई चे वाटप करण्यासाठी 76 कोटी 39 लाख 80 हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता.
या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 13000 ऐवजी 27000 हेक्टरी मदत मिळणार; लगेच आपले नाव पहा
खालील प्रमाणे तालुका निहाय नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले:
1. परभणी तालुका- 37 कोटी रुपये
2. सेलू तालुका- 7 कोटी रुपये
3. पाथरी तालुका- 9 कोटी 74 लाख रुपये
4. पूर्णा तालुका- 22 कोटी 10 लाख रुपये
या जिल्ह्याची आज नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर; लगेच यादी पहा व तुमचे नाव चेक करा
महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता अनुदान म्हणून 13 हजार 600 रुपये हेक्टरी मदत देण्यात येत आहे. एक शेतकरी जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत अनुदान मिळण्यास पात्र आहे. जिल्ह्यात नुकसान भरपाई झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते. त्यामुळे संबंधित तलाठ्यांनी शेतजमिनीचे पंचनामे केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना याद्यानुसार तसेच नुकसान भरपाईनुसार रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.