‘कापूस दरवाढीबाबत नुसत्या अफवा!’ आज कापसाला मिळाला फक्त एवढाच बाजार भाव | Cotton Rate Today

शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजार भाव वाढतील याची सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. गेल्या वर्षी या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना कापसाचा बाजार भाव हा दहा हजार पेक्षा जास्त मिळत होता. परंतु या वर्षीचा विचार करता तसेच चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे कापसाचे भाव यावर्षी 22000 मिळतील किंवा 16000 मिळतील याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. परंतु सध्याचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्रात कापसाचा जास्तीत जास्त दर हा 8500 इतकाच आहे.

मित्रांनो आजच्या कापूस बाजार भावाचा विचार करता, राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये कापसाचा सरासरी दर हा 8 हजार रुपये पेक्षा कमी होता. सर्व बाजार समिती यांचा सरासरी कापूस बाजार भाव विचार करता तो 8 हजार ते 8 हजार 300 रुपये इतकाच आहे.

 

मित्रांनो कापूस हे असे पीक आहे, या पिकावर इतर पिकांच्या तुलनेत येणारा सरासरी खर्च जास्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचा बाजार भाव हा किमान 10हजार रुपये मिळाला तरच शेतकऱ्यांना कापूस हे पीक फायदेशीर ठरतो. ज्यावेळेस सुरुवातीला बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस विकण्याकरिता येऊ लागला होता, त्यावेळेस कापसाचे बाजार भाव हे चांगले होते. दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर त्यावेळेस कापसाला मिळत होता. परंतु सध्या हे चित्र पलटलेले आहे. अनेक ठिकाणी कापसाचा दर हा आठ हजाराच्या जवळपास आहे.

 

अजूनही शेतकऱ्यांच्या घरात कापूस तसाच साठवून!

मित्रांनो यावर्षी अनेक शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षी प्रमाणे कापसाला दर मिळेल या अपेक्षेने अजूनही त्यांचा कापूस विकलेला नाही. अनेक शेतकरी कापूस दहा हजार पार होतील याची अपेक्षा पाहत आहे. अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये त्यांचा कापूस बारा हजार रुपये प्रति क्विंटल ने विकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे बाजार भाव वाढतील अशी अपेक्षा आहे.

 

कापसाचे बाजार भाव वाढतील?

मित्रांनो सध्या जरी आपल्या देशात कापसाचा बाजारभाव कमी असला तरीसुद्धा तज्ञांच्या मते चीन आणि पाकिस्तान या देशांकडून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरामध्ये कापसाच्या बाजारभावात वाढ झाल्यास देशाच्या बाजारभावावर त्याचा परिणाम होऊन देशातील कापूस बाजार भाव वाढू शकतात. तसेच आपल्या देशात लवकरच वायदे बाजार सुरू होणार आहे. त्यामुळे याचा सुद्धा सकारात्मक परिणाम कापूस बाजार भावावर होईल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच अपडेट: या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 13वा हप्ता मिळणार नाही? लगेच तुमचे नाव चेक करा.

 

आजचे विविध बाजार समितीमधील कापुस बाजार भाव:-

1. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती- कमीत कमी दर 7800 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 8100 तर सरासरी दर हा 8000 रुपये होता.

2. सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती- कमीत कमी कापूस बाजार भाव 7700 रू, जास्तीत जास्त दर 8150 रू तर सरासरी दर हा 8000 रू आहे.

3. सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती- कमीत कमी कापूस दर हा 7500 तर जास्तीत जास्त दर हा 8000रू तर सरासरी दर हा 7900

4. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती- कमीत कमी कापूस दर हा 7700 तर जास्तीत जास्त कापूस दर हा 8300 तसेच सरासरी दर 8100 इतका होता.

5. अकोला बाजार समिती- कमीत कमी कापूस दर हा 8000 तर जास्तीत जास्त कापूस दर 8350 तसेच सरासरी दर 8100

नवीन घरकुल यादी 2023 नुकतीच जाहीर! आत्ताच तुमचे यादीत येथे नाव पहा

अशाप्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कापूस बाजार भाव होता, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे दर कसे राहतील, याबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढील पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पोहोचवा, असेच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!