मित्रांनो भारत देशात कापसाच्या दरवाढी साठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. तरी सध्या देशभरातील कापूस बाजार भाव दबावात आहे. गेल्या दोन-तीन दिवसात कापसाच्या बाजारभावात सुधारणा दिसून आलेली आहे. परंतु आज कापसाचे दर थोडेफार नरमलेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात चढ-उतार सुरू असून आज राज्यात कापसाचे बाजार भाव थोडेफार नरमलेले आहे.
तसेच तज्ञांच्या मते देशभरात कापसाच्या बाजार भाव वाढीसाठी पोषक वातावरण असून दरवाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला बाजार भाव वाढून देण्याची मानसिकता उद्योगांची नसल्याची खंत शेतकरी वर्तवत आहे परंतु तज्ञांच्या मते जास्त काळ उद्योग Cotton Rate दबावात ठेवू शकणार नाही.
संपूर्ण देशभरातील कापूस दरामध्ये सुधारणा होत असून अनेक दिवसांपासून नरमलेले असणारे कापसाचे बाजार भाव थोडाफार प्रमाणात का होईना पण वाढत आहेत. काल संपूर्ण दिवसभरात संपूर्ण देशभरात कापसाच्या एक लाख छत्तीस हजार गाठींची आवक झाली होती. कापसाच्या दरात वाढ होत असल्यामुळे आवक सुद्धा वाढताना दिसत आहे.
आज कापसाचा बाजार भाव कसा होता?
संपूर्ण देशभरातील आजचा Cotton Market Price विचारात घेतल्यास आज दिवसभरात कापसाला कमीत कमी दर हा 7500 ते जास्तीत जास्त दर हा 8750 रुपयांपर्यंत पोहोचला होता. कापसाचा सरासरी जर विचार घेतल्यास तो 8000 रुपये प्रतिक्विंटल इतका निघतो.
कापसाच्या वायद्यांच्या बाजारभावातील विचार करता एप्रिल महिन्यातील कापसाचे वायदे हे एमसीएक्सवर 140 रुपयांनी कमी झाले तर एप्रिल डिलिव्हरी चे फायदे 63 हजार 640 रुपयांवर बंद झालेले आहे. तर जून महिन्यातील वायदे 220 रुपयांनी वाढून 63 हजार 780 रुपयांवर बंद झाले होते.
कापसाचा भाव पुढे कसा राहील, ते मार्च महिना ठरवेल; कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्च महिना महत्त्वाचा
बाजारात अजूनही कापसाची आवक कमीच!
मित्रांनो एक प्रकारे शेतकरी कापसाची परीक्षा घेतोय का किंवा कापूस शेतकऱ्यांची परीक्षा घेतोय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना हव्या त्या प्रमाणात कापसाचे बाजार भाव वाढत नसून शेतकरी सुद्धा हव्या त्या प्रमाणात कापसाची विक्री करताना दिसत नाही आहे. राज्यातील निम्म्या सुद्धा शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विकलेला नाही. राज्याच्या उत्पन्नातील 50 टक्के एवढा कापूस शेतकऱ्यांच्या घरात तसाच सुरक्षित साठवून ठेवण्यात असल्याची माहिती व अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी केवळ 1,32,000 गाठी इतकाच कापूस विकलेला आहे.
कापूस दरवाढ होईल का?
मित्रांनो तज्ञांच्या मते शेतकऱ्यांनी कापसाची विक्री मर्यादित प्रमाणात ठेवल्यास कापसाचे बाजार भाव आहे त्या प्रमाणात स्थिर राहणार आहे. म्हणजे सध्याचे असणारे कापसाचे भाव असेच टिकून राहणार आहे. परंतु दीड लाख हजार गाठींवर असलेली कापसाची आवक दोन लाख गाठींवर गेल्यास दर थोड्याफार प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी थोड्या प्रमाणात कापसाची विक्री केलेली होती त्याच प्रमाणात विक्री झाल्यास दर सुधारू सुद्धा शकतात.
तसेच येणारा पुढचा महिना हा मार्च महिना आहे त्यामुळे मार्च महिना कापसाचे भवितव्य ठरवणार असल्याची अंदाज तज्ञांचा आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये कापसाचा दर आठ हजार पाचशे रुपये पर्यंत राहू शकतो असा अंदाज तज्ञांचा आहे