शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यात जास्तीत जास्त प्रमाणात कापसाचे उत्पादन घेण्यात येत असते. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेण्यात येत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्हाला कापूस लागवड केलेली दिसेल. त्यामुळे कापसाच्या बाजारभावाबाबत अनेक शेतकरी चिंतातुर आहेत. कापसाचे बाजार भाव वाढण्याची अनेक शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. या पोस्ट मध्ये आपण Cotton Rate Maharashtra संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभावाचा विचार करता, राज्यामध्ये कापसाला पुरेशा प्रमाणात भाव मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांचा कापूस विकलेला नाही, कारण की अनेक शेतकरी cotton rate Maharashtra वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत. मित्रांनो कापसाच्या बाजारभावाचा विचार करता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजार भाव मध्ये तेजी असली तरी सुद्धा देशभरात कापसाच्या बाजारभावात हव्या तेवढ्या प्रमाणात अजूनही वाढ झालेली नाही.
सध्या बाजारामध्ये कापसाची विक्री सुरू असून कापूस बाजारामध्ये येऊन चार महिने उलटले आहे तरीसुद्धा कापसाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस बाजारामध्ये आलेला असता थोडाफार चांगला दर शेतकऱ्यांना मिळत होता. मध्यंतरी कापसाचे भाव दहा हजार पार झाले होते. परंतु सध्या हे भाव 2 हजार रुपये नी कमी होऊन आठ हजार रुपये पर्यंत आलेले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी चिंतेत पडले आहे. गेल्या वर्षीचा विचार करता या महिन्यांमध्ये गेल्या वर्षी कापसाला किमान दहा हजार रुपये भाव मिळत होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला डिमांड?
परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारांमधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता दिलासादायक बातमी प्राप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये थोड्या प्रमाणात कापसाला तेजी असल्याची चित्र दिसत आहेत. याचा फायदा राज्यातील तसेच देशातील अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जरी सुद्धा कापसाला तेजी असली तरी सुद्धा देशभरात आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत कापसाचे दर फार कमी आहे. त्यामुळे देशातील अनेक शेतकरी कापसाच्या बाजारभावावरून नाराज आहेत.
कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच!
सुरुवातीला दहा हजार पार असणारे Cotton Rate अचानक कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अजून पर्यंत कापूस विकलेला नाही. गेल्या वर्षीचा विचार करता गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास 70 टक्के शेतकरी अजूनही कापूस दरवाढ होण्याची वाट पाहत आहेत.
पी एम किसान 13 वा हप्ता या तारखेला जमा होणार; अधिकृत तारीख जाहीर
कापसाच्या बाजार भावात वाढ होणार ?
मित्रांनो सध्या कापसाच्या दराचा विचार करता कापसाला जास्तीत जास्त दर हा 8 हजार 500 रुपये पर्यंत मिळत आहे. तसेच आता कापसाचे वायदे बाजार सुद्धा सुरू होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली कापसाचे तेजी लक्षात घेता कापसाचे दरवाढ होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरच कापसाच्या दर वाढ संदर्भात शेतकऱ्यांना खुशखबर मिळेल अशी अपेक्षा आहे.