कापूस बाजार भाव पुन्हा 12 हजार वर जाणार? जाणून घ्या पुढील 2 महिने काय अवस्था होणार कापसाची | Cotton Market

मित्रांनो सध्या कापसाच्या बाजार भावाचे स्थिती लक्षात घेता, आणि कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे बाजार भाव वाढतील या अपेक्षेने चिंता तुर झालेली आहेत. गेल्यावर्षी कापसाच्या बाजारभावाचा विचार करता यावर्षी ते चार हजार रुपये प्रति क्विंटल कमी आहे. गेल्या वर्षी कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता. परंतु सध्या कापसाचे दर आठ हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये कापसाचा बाजार भाव कसा राहील? तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाची काय परिस्थिती आहे या Cotton Market संदर्भात संक्षिप्त माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

यावर्षी कापसाची बाजारभावाची ओपनिंग ही खूप चांगली झालेली होती. यावर्षी मध्यंतरी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत होता. परंतु काही कालावधी नंतर हे दर कमी होत गेले, आणि आता शेवटी हे जर आपल्याला आठ हजाराच्या आसपास पाहायला मिळत आहे. मित्रांनो गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत होता. परंतु यावर्षी सध्याच्या बाजार भावाचा विचार करता गेल्यावर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये इतका तोटा होत आहे.

 

मित्रांनो गेल्यावर कापूस पीक उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारा खर्च हा 15 टक्के नि वाढलेला आहे. कापूस वेचणीच्या मजुरीच्या दरामध्ये झालेली वाढ, तसेच यावर्षी खतांच्या दरात सुद्धा वाढ झाली होती. परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेल्या Cotton Market Price कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. उलट कापसाचे दर यावर्षी कमी झालेली आहेत.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 200 कोटी पिक विमा जमा होण्यास सुरुवात; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कोणते शेतकरी आहेत पात्र

कापूस दरवाढीबाबत अमेरिकन कृषी विभागाचे मत

अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापसाचे उत्पादनात कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच त्यांनी यावर्षी कापसाचे दर टिकून राहण्याची सुद्धा अंदाज व्यक्त केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे जागतिक लेव्हलवर विविध देशांमध्ये होणारे कापसाचे उत्पादन हे अठरा लाख गाठींनी कमी होण्याची शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागाने वर्तवली आहे. यावर्षी एकूण उत्पादन झालेल्या कापसांच्या गाठीच्या उत्पादनापैकी 86 लाख गाठी कापूस कमी वापरण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध देशांमधील प्रामुख्याने चीनची आयात तसेच बांगलादेश, तुर्की यांची आयात कमी होणार आहे.

अखेर या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी झाली जाहीर; लगेच यादी चेक करून आपले नाव पहा

भारताच्या कापसासाठी बांगलादेश मधील आयात महत्त्वाची?

भारताचा प्रमुख कापूस ग्राहक हा बांगलादेश आहे, त्यामुळे भारतीय कापूस बाजारभावावर परिणाम करणारा बांगलादेश हा एक महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये होणारे कापसाची आयात महत्त्वाची ठरणार आहे. मागील हंगामा पेक्षा या वर्षीच्या हंगामामध्ये बांगलादेश तीन लाख गाठी कमी आयात करणार असल्याची शक्यता आहे.

हे नक्की वाचा:या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 11 हजार पिक विमा जमा; शेतकऱ्यांना विमा जमा झाल्याचे एसएमएस प्राप्त

इथून पुढे कसे राहतील कापसाचे दर Cotton Market Rate

मित्रांनो अमेरिकन कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावर्षीच्या हंगामामध्ये कापसाचा दर 84 सेंड प्रति पाऊंड असा राहण्याची शक्यता आहे. देशातील अनेक सूतगिरण्या 90% क्षमतेने सुरू झालेले आहेत. देशातील कॉटन उद्योगांना चांगला नफा सुद्धा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सध्या टिकून आहेत. आपल्या भारत देशा मधून कापसाची निर्यात करण्यात येत असते, ती सुद्धा सध्या सुरू आहे. परंतु आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजार भावाचा विचार करता देशांमध्ये थोड्याफार प्रमाणात कमी दर कापसाला मिळत आहे. परंतु देशातील सध्या असलेले दर सुधारतील असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलेले आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये कापसाचा दर हा 7500 ते 8500 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. परंतु हा दर कापसाची होणारी आयात तसेच निर्यात व उत्पादन या सर्व बाबींवर अवलंबून असणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!