मित्रांनो लोकापूस दर पुन्हा पोहोचला 8850 वर; या बाजार समितीत आज मिळाला जास्तीत जास्त दर; कापसाचे चांगले दिवस येतील | Cotton Market Price Maharashtra राज्यातील जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला कापसाचा बाजार भाव हा अतिशय कमी असल्यामुळे तो अजून कमी होईल या धाकाने अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस सुरुवातीलाच विकला होता. परंतु यावर्षी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पेक्षा सुद्धा जास्त चांगला दर मिळेल या अपेक्षेने अजून पर्यंत त्यांचा कापूस विकलेला नाही. परंतु बाजार भाव हे कमी होत गेले आणि शेतकरी नाराज होत गेला. परंतु आता शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यांच्या कापसाला Cotton Market Price ला चांगले दिवस येतील असे चित्र दिसत आहे.
कापसाचा दर पोहोचला 8850 वर
मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसात कापसाच्या बाजारभावात थोड्याफार प्रमाणात चांगली सुधारणा होत आहे. मित्रांनो राज्यातील काही बाजार समितीमध्ये कापसाने 8850 रुपयांचा टप्पा गाठला आहे. हा Cotton Market Rate चार ते पाच दिवसाआधी सात हजार नऊशे ते आठ हजार रुपये पर्यंत होता. परंतु काही बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त दर 8850 मिळालेला आहे. त्यामुळे एका दिवसात कापसाला चांगले दिवस मिळतील असे चित्र सध्या निर्माण होत आहे.
परंतु कापसाला मिळालेला हा दर सर्वच बाजार समितीमध्ये नाही. काही बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 8500 ते जास्तीत जास्त 8300 पर्यंत दर आहे परंतु राज्यातील काही बाजार समितीमध्ये तो दर 8850 जास्तीत जास्त पर्यंत पोहोचला होता.
कापसाच्या बाजार भावात किंचित सुधारणा:
कापसाच्या बाजारभावातील किमान दर पातळी कायम असली तरी सुद्धा कापसाच्या बाजारभावातील कमाल जास्तीत जास्त दराने काल चांगली झेप घेतलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कापूस बाजार भाव वाढण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे. मित्रांनो सध्या देशातील अनेक बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढलेली आहे. फेब्रुवारी महिना सध्या सुरू असून या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात Cotton Market Rate खूप कमी झाले होते. परंतु आता किरकोळ प्रमाणात का होईना दरात सुधारणा पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसात प्रत्येक बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजार भावात 100 ते 200 रुपयांची सुधारणा पाहायला मिळत आहे.
देशातील वायदे बाजार
कापूस वायद्यांचा विचार करता वायद्यांमध्ये आज वाढ झालेली आहे. आज एप्रिलच्या डिलिव्हरीच्या वायद्यांमध्ये 180 रुपयांची सुधारणा पाहायला मिळालेली आहे. कापूस वायदे हे ६४ हजार २० रुपये प्रतिखंडी या दरावर होते. तर जूनच्या वायद्यामध्ये 260 रुपयांची सुधारणा झालेली असून ते ६४५०० इतके होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर काय होते?
मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर हे स्थिर आहेत आणि टिकून आहेत. अमेरिका या देशातील कापूस पाकिस्तान आणि चीन हे देश खरेदी करत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस टिकून आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे बाजारचा विचार केल्यास ते 85 सेंड प्रति पाउंड इतका होता. तर काॅटलूक ए इंडेक्स हा 100.85 सेंट प्रतिपाऊंड होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला प्रचंड तेजी; येथे क्लिक करून पहा आजचा कापूस बाजार भाव
कापसाचे बाजार भाव वाढतील का? Will the market price of cotton increase?
मित्रांनो जागतिक कापूस उत्पादन कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव स्थिर आहेत आणि टिकून आहेत. देशातील कापूस उत्पादन हे 321 लाख गाठींवर स्थिरावलेली असल्याची माहिती मिळत आहे. कापसावर आधारित कापूस उद्योग देशात मोठ्या प्रमाणात तसेच पूर्ण क्षमतेने सुरू आहेत तसेच कापूस देशातून इतर देशाला होणारी निर्यात देखील सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात कापसाचा दर हा 8500 ते 9000 रुपये इतका राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.
त्यामुळे येणारा पुढील काळ हा कापूस या पिकासाठी कसा राहील ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.