मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत पदवीधर असलेल्या उमेदवारांना शासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना यापूर्वी सुरू करण्यात आलेली होती, परंतु दोन वर्षांपूर्वी ही CM Felloship Program योजना बंद केल्यामुळे पुन्हा एकदा शासनाने युवकांना शासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नवीन मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम योजना सुरू केलेली आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत तरुणांना प्रशासनाच्या कामाची आवड तसेच तंत्रज्ञानाची आवड होणार आहे तसेच त्यांना सरकारचा भाग बनवण्याची संधी निर्माण होत आहे. या CM Felloship Program Maharashtra मुळे शासनाला सुद्धा फायदा होणार आहे. प्रशासकीय प्रक्रियांची कामांची गती या प्रोग्राम मुळे वाढणार आहे. तरुणांना एक वर्ष दरमहा 75 हजार रुपये वेतन मिळणार आहे.
पात्रता काय आहे?
1. उमेदवारांची वय हे 21 ते 26 यादरम्यान असावे.
2. उमेदवार हा कोणत्याही शाखेतील किमान 60 टक्के गुण मिळवून पदवीधर असावा.
3. उमेदवाराकडे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे पुरेशी ज्ञान असावे.
मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम चे स्वरूप:
खालील प्रमाणे राज्यात पदवीधरांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी उपयुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम राबविण्यात येत आहे.
1. निवड झालेल्या उमेदवारांना या योजने अंतर्गत 12 महिने
स्वरूप फेलो म्हणून काम करता येईल.
2. योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्व फेलोंना एकाच दिवशी रुजू करण्यात येईल.
3. निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, आयुक्त तसेच शासनाचे सचिव व महामंडळाचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये नेमणूक करण्यात येईल.
4. निवड झालेल्या उमेदवारांना आयआयटी मुंबई किंवा आयआयटी नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. तसेच फिल्ड वर्क चे काम सुद्धा करावे लागेल.
5. जे उमेदवार या cm fellowship yojana अंतर्गत निवड झालेले आहेत त्यांनी अभ्यासक्रम आणि फिल्ड वर्क पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या योजने अंतर्गत शासनासोबत काम करून 75 हजार रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
अशाप्रकारे पदवीधर असलेल्या राज्यातील अनेक तरुणांना शासनाचा एक भाग म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत सध्या नवीन अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांचा अर्ज करायचा आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे व इतर सर्व माहिती येथे पहा
अशाप्रकारे आपण पदवीधरांसाठी असलेली महत्त्वाची व एक छोटीशी अपडेट जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या विविध महत्त्वपूर्ण माहिती करिता नियमितपणे या वेबसाईटवर भेट देत राहा.