बांधकाम कामगारांना सेफ्टी किट (पेट्या) वाटप सुरू; असा करा अर्ज, लगेच मिळेल बांधकाम कामगार पेटी तसेच अनेक वस्तू | Bankdhkam Kamgar Yojana Safety Kit

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येत असतो. ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे अशा बांधकाम कामगारांना सध्या Bankdhkam Kamgar Safety Kit  म्हणजेच बांधकाम कामगार पेट्या यांचे वाटप करण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण बांधकाम कामगार सुरक्षा किट कशा मिळवायच्या या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभाग मार्फत विविध प्रकारच्या 32 योजनांचा लाभ देण्यात येत असतो. यापैकी बांधकाम कामगारांकरिता असणारी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे सुरक्षा संचाचे वाटप करणारी योजना. या Bankdhkam Kamgar Yojana Maharashtra अंतर्गत नोंदणी केलेल्या असलेल्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार सुरक्षा संच म्हणजेच बांधकाम कामगार पेट्या वितरित करण्यात येत असतात.

बांधकाम कामगार सुरक्षा संच कुणाला मिळणार? Who will get Bandhkaam Kamgar safety kit?

मित्रांनो बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत वितरित करण्यात येणारे सुरक्षा संच हे केवळ नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगार यांनाच वितरित करण्यात येत असतात. याकरिता तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम विभाग यांच्याकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार बनण्यासाठी अर्ज करावा लागेल. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही Bankhkam Kamgar Safety Kit मिळण्यास पात्र असाल.

पी एम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले का? ते असे चेक करा ऑनलाईन

बांधकाम कामगार सुरक्षा संच मध्ये मिळणाऱ्या वस्तू:

मित्रांनो बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सेफ्टी किट म्हणजेच पेट्या मध्ये खालील प्रकारच्या वस्तू असतात.

1. बॅग
2. बांधकाम करण्यासाठी लागणारे जॅकेट
3. हेल्मेट
4. स्टेनलेस स्टीलचा टिफिन चा डब्बा
5. टॉर्च
6. सेफ्टी बूट
7. पाणी पिण्यासाठी बॉटल
8. चटई
9. मच्छरदाणी ची जाळी
10. सेफ्टी बेल्ट
11. हॅन्ड ग्लोज

अशाप्रकारे अनेक प्रकारच्या वस्तू नोंदणी खूप बांधकाम कामगारांना या सुरक्षा किटमध्ये मिळत असतात.

कडबा कुट्टी मशीन मशीन खरेदी करण्यासाठी नवीन अर्ज सुरू; 75 टक्के अनुदान, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

बांधकाम कामगार सेफ्टी किट चा लाभ कसा मिळवायचा? How to Apply for Bandhkam Kamgar Safety Kit?

सर्वप्रथम जर तुम्ही अजून पर्यंत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार विभाग यांच्याकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला आता विहित नमुन्यातील बांधकाम कामगार सेफ्टी किट चा ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. सुरक्षा संचाचा अर्ज करण्याची लिंक तसेच अर्जाचा पीडीएफ आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.

बांधकाम कामगार सेफ्टी किट (पेट्या) मिळवण्यासाठी करावयाचा अर्ज येथे पहा

वरील अर्जासोबत तुम्हाला तुमच्या आधार कार्ड तसेच नोंदणी केल्याची पावती तसेच बांधकाम कामगार ओळखपत्र तुम्हाला बांधकाम कामगार विभागाकडे सुपूर्द करायचं आहे.

वरील अर्ज केल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार सुरक्षा पेटी म्हणजेच सुरक्षा संच मिळवू शकाल. बांधकाम कामगार योजने संदर्भातील महत्त्वाची असणारी ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!