औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांच्या नामांतरणास मंजुरी; आता औरंगाबाद झाले छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद झाले धाराशिव; शासन निर्णय पहा

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या तसेच उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला अखेर केंद्र शासनाने काल मंजुरी दिलेली आहे. याबाबत सर्व वृत्तपत्रावर तसेच मीडियावर बातम्या प्रकाशित झालेल्या असून महाराष्ट्र शासनाने देखील नामांतरणासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जाहीर केलेला आहे.

अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या या दोन शहरांच्या नामांतरणाची नामांतरण प्रक्रिया आता शंभर टक्के पूर्ण झालेली असून आजपासून औरंगाबाद शहराचे नाव हे बदललेले असून त्याला आता छत्रपती संभाजीनगर असे नाव आहे. तर उस्मानाबाद या शहराचे नाव बदललेले असून त्याला आता धाराशिव म्हणायचे आहे.

 

उस्मानाबाद शहराचे नामांतरण धाराशिव करण्याचा शासन निर्णय येथे पहा

 

औरंगाबाद शहराचे नामांतरण छत्रपती संभाजी नगर करण्याचा शासन निर्णय येथे पहा

 

वरील लिंक वरून तुम्ही त्या जिल्ह्याच्या नामांतरणाचा अधिकृत शासन निर्णय पाहू शकतात. महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2023 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून तसेच केंद्र शासनाने मान्यता देऊन अखेर ही नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!