औरंगाबाद चे छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर झाले; अधिकृत शासन निर्णय जाहीर; अखेर केंद्र सरकारने दिली मंजुरी

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद शहराचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नामांतरण धाराशिव करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला होता. महाराष्ट्र शासनाने नामांतरणाचा जाहीर केलेला हा निर्णय राज्य शासनाच्या मार्फत मंजूर करून त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला होता. आता त्याला केंद्र शासनाने मंजुरी देऊन नामांतरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. या लेखात आपण औरंगाबाद शहराचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव या नामांतराचा अधिकृत शासन निर्णय जाणून घेणार आहोत.

आजच्या पोस्ट मध्ये आपण राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांच्या नामांतरणाबद्दल केंद्राने जाहीर केलेल्या अधिकृत निर्णय पाहणार आहोत. अखेर नामांतरणाला मंजुरी मिळालेली असून अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा विषय आता पूर्णत्वास गेलेला आहे.

अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर ठेवण्याचा तसेच उस्मानाबाद शहराचे नामांतरण करून त्याला धाराशिव करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला होता. हा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाला निर्णय झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवायचा असतो. या दोन शहरांच्या नामांतरणाचा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनाने अखेर या दोन शहरांच्या नामांतरणाला मंजुरी दिलेली आहे.

 

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झालेला शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्षांची तसेच जिल्ह्यातील बांधवांची औरंगाबाद शहरांची नामांतरण करण्याची मागणी होती. ती आता पूर्णत्वास गेलेली आहे.

 

उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव झालेला शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

केंद्र शासनाने दोन्ही शहरांच्या नामांतरणास मंजुरी दिलेली असून राज्य शासनाने देखील अधिकृत शासन निर्णय जाहीर करून त्याबाबत माहिती कळवलेली आहे. जर तुम्हाला दोन्ही शहरांच्या नामांतराची अधिकृत शासन निर्णयाची पीडीएफ पाहिजे असेल तर वरील लिंक वरून ते तुम्ही पाहू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!