अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या घरपडझडीच्या नुकसानीकरिता 10 कोटी निधी वितरित; नवीन शासन निर्णय जाहीर, फक्त यांनाच मिळेल लाभ | Ativrushti Pur Nuksan Bharpai

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात सन 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी निर्माण झालेली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची घरे पाण्यामध्ये गेली होती. अनेकांची घरे अक्षरशः पडली होती, तसेच या जिल्ह्यातील नागरिकांना काही दिवस मोठ्या पुरामुळे घराबाहेर राहावे लागले होते. त्यामुळे या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर करून सांगली जिल्ह्यासाठी 10 कोटी रुपये निधी वितरित केलेला आहे. जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना हा निधी मिळणाऱ्या Ativrushti Pur Nuksan Bharpai Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो राज्यात जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता तसेच मोठ्या प्रमाणात Ativrushti Nuksan Bharpai झालेली होती. या मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टीचा फटका हा राज्यातील सांगली या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला होता. सांगली जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान या Ativrushti Pur मुळे झालेले होते. या जिल्ह्यातील अनेक व्यक्तींची घरे अक्षरशः पडली होती अनेकांची घरे वाहून गेली होती तर अनेक शासकीय मालमत्ता यांची सुद्धा नुकसान झालेले होते. तसेच शेतकऱ्यांचे पीक तर अक्षरशः नष्ट झाली होती.

 

त्यामुळे या जिल्ह्यातील अनेक व्यक्ती असे होते ज्यांची घरे कोसळली होती परंतु त्यांना अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढून दहा कोटी रुपये वितरणास मान्यता दिलेली आहे.

 

शबरी आवास योजना अंतर्गत 93288 घरकुल वितरित होणार; नवीन निर्णय जाहीर, कुणाला मिळेल लाभ? जाणून घ्या!

 

सांगली जिल्ह्यासाठी नवीन नुकसान भरपाई निधी मंजूर Nuksan Bharpai Nidhi Manjur

मित्रांनो सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे घरपडझडीच्या नुकसानीसाठी नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आज नवीन शासन निर्णय काढून 10 कोटी 1 लाख 76 हजार रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांची घरे मोठ्या प्रमाणात झालेले अतिवृष्टीमुळे पडलेली होती, तसेच कोसळली होती अशा नागरिकांना हा निधी आता वितरित करण्यात येणार आहे.

 

घरपडझडीच्या नुकसानीकरिता मिळालेला निधी कधी वितरित होणार?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्ह्यासाठी मंजूर केलेला 10 कोटी एक लाख 76 हजार रुपये हा निधी आता लवकरच नुकसानग्रस्तांना वितरित होणार आहे. शासनाने जाहीर केलेला हा निधी लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर हा Nuksan Bharpai Maharashtra Nidhi अंतिम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना वितरित करण्यात येणार आहे.

नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी व खुशखबर; 1000 कोटी निधी वितरित, शासन निर्णय जाहीर

नुकसान भरपाई शासन निर्णय जाहीर:

महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्हा करिता मंजूर केलेला दहा कोटी एक लाख 76 हजार रुपये इतका निधी मंजूर केल्या बाबत शासन निर्णय जाहीर केलेला आहे. हा Nuksan Bharpai शासन निर्णय जर तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे.

 

नुकसान भरपाई निधी वितरणाचा शासन निर्णय येथे पहा

 

वरील लिंक वरून तो शासन निर्णय तुम्ही पाहू शकता तसेच तुमच्या मोबाईल मध्ये देखील सेव करून ठेवू शकतात. अशाप्रकारे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील सांगली जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची अपडेट आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती जिल्ह्यातील सर्व मित्रांना शेअर करा, अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!