अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाईची रक्कम; निधी वितरणासाठी नवीन पोर्टल जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे लवकरात लवकर वितरित करण्यासाठी नवीन पोर्टल जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता राज्यातील अनेक अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई चे पैसे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या Ativrushti Nuksan Bharpai संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने प्रकाशित केलेला आहे.

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये सन 2022 यावर्षी अनेक प्रकारचे नैसर्गिक आपत्ती आल्या त्यामध्ये प्रामुख्याने अतिवृष्टी तसेच गारपीट यामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना झालेल्या Ativrushti Nuksan Bharpai चे वितरण करण्यासाठी राज्य शासनाने निधी देखील मंजूर केलेला आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांना दुरुस्ती नुकसान भरपाई चे पैसे देखील मिळालेले आहेत.

 

परंतु मित्रांनो शेतकऱ्यांची नुकसान झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागत आहेत, अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट तसेच वेळ खाऊ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होत होता, याच अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने आता अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वितरणाच्या प्रक्रियेमध्ये नवीन बदल केलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना Nuksan Bharpai Maharashtra चे पैसे जलद मिळणार आहे.

 

आजचे सर्व पिकांचे बाजार भाव; जाणून घ्या विविध शेतमालाचा कमीत कमी व जास्तीत जास्त दर

नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया होणार जलद:

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण असा नवीन शासन निर्णय काढून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची पैसे आता महा आयटी पोर्टल द्वारे वितरित करण्यात येणार आहे. या महा आयटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आधार प्रमाणीकरण केल्यानंतर नुकसान भरपाई चे पैसे मिळणार आहे. पूर्वीप्रमाणे असणारी Ativrushti Nuksan Bharpai ची प्रक्रिया पूर्णता बदलण्यात आलेली असून आता इथून पुढे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या याद्या सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येतील.

 

त्यानंतर शेतकरी बांधवांना त्यांची ओळख पटवून देण्याकरिता महा आयटी या पोर्टलवर त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावी लागेल. आधार प्रमाणे करून केलेल्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जेवढे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तेवढी रक्कम जमा करण्यात येईल.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र 2023; अर्ज प्रक्रिया, पात्रता

शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे अतिशय जलदपणे मिळणार आहे. तसेच जे बोगस शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ मिळवत होते असे शेतकरी आता वगळण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या याद्या सुरुवातीला प्रकाशित करण्यात येईल. त्यामुळे निधी वितरणाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता निर्माण होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल. शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणाच्या आधारे त्यांची ओळख सिद्ध करून द्यावी लागेल.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय येथे पहा

 

 

निधी वितरणाच्या प्रक्रियेत काय बदल होणार?

आता पूर्वीप्रमाणे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळणार नसून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई ची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांची बँक खात्याची माहिती तसेच नुकसान भरपाई संदर्भात सर्व माहिती अपलोड करण्यात येईल. त्यानंतर शेतकरी बांधवांच्या नुकसान भरपाई च्या सर्व याद्या शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात येईल. आता जर कुणाचा आक्षेप असेल किंवा शेतकऱ्यांची काही माहिती चुकीची असेल तर ती दुरुस्त करण्याकरिता वेळ देण्यात येईल. यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जाऊन ई केवायसी पूर्ण करून घ्यावी लागेल. ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!