या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे 675 कोटी रुपये वितरित करण्यासाठी नवीन शासन निर्णय जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai Update Maharashtra

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत नवीन शासन निर्णय काढून 675 कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही दहा जिल्हे कोणते आहे? तसेच त्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना Ativrushti Nuksan Bharpai मिळणार या संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली होती, त्यानंतर शेतकरी बांधवांकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरित करावी अशी शासनाकडे विनंती केली होती. शासनाच्या मार्फत अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आलेले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या मार्फत एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट रक्कम ही शेतकऱ्यांना वितरित करण्याची घोषणा करण्यात आलेली होती.

 

त्यानंतर जे जिल्हे नुकसानग्रस्त ठरविण्यात आलेले होते, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झाले होते. अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना Ativrushti Nuksan Bharpai Update Maharashtra 2023 वितरित करण्यासाठी शासनाने वेळोवेळी शासन निर्णय काढून निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती. परंतु राज्यातील खालील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची Nuksan Bharpai 2023 ची रक्कम वितरित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी शासनाकडे वेळोवेळी निवडणे देऊन तसेच शासन दरबारी आपली व्यथा मांडून Nuksan Bharpai Vitarit करण्यास मागणी केली होती. त्यामुळे आता राज्य शासनाने या दहा जिल्ह्यांकरिता 675 कोटी अतिरिक्त निधी मंजूर करून निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे.

 

 

अत्यंत महत्त्वाची बातमी 50000 अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का?

कोटी नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यांना मिळणार? Ativrushti Nuksan Bharpai List

खालील दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 675 कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येणार आहे. त्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करून निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली असून तो शासन निर्णय सुद्धा आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.

1. सातारा – 17 कोटी

2. पुणे – 42 कोटी 82 लाख

3. सांगली – 42 कोटी 25 लाख

4. सोलापूर – 110 कोटी 56 लाख

5. कोल्हापूर – 03 कोटी 76 लाख

6. नाशिक – 89 कोटी 20 लाख

7. धुळे – 51 कोटी 04 लाख र

8. नंदुरबार – 6 लाख 68 हजार

9. जळगाव – 27 कोटी 76 लाख

10. अहमदनगर – 290 कोटी 91 लाख

वरील प्रमाणे वरील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे.

पहा कोणत्या शेतकऱ्याला किती आली अतिवृष्टी नुकसान भरपाई; याद्या जाहीर

675 कोटी वितरणाचा शासन निर्णय जाहीर:

मित्रांनो वरील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टीची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत जीआर जाहीर करून हा निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 675 कोटी वितरण शासन निर्णय येथे पहा

 

हेक्टरी नुकसान भरपाई किती रुपये मिळणार?

गिरायत क्षेत्रासाठी 13 हजार 600 रुपये हेक्टरी तर बागायत क्षेत्रासाठी 27 हजार रुपये हेक्टरी व बहुवार्षिक क्षेत्रासाठी 36 हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत लाभ मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!