अतिक्रमण केलेली जमीन परत मिळण्यासाठी असा करा अर्ज; जाणून घ्या अतिक्रमण हटवण्यासाठी करावयाच्या अर्जाची प्रक्रिया | Atikraman Jamin Parat

मित्रांनो जर एखाद्या ठिकाणी अतिक्रमण झालेले असेल आणि ती जमीन तुम्हाला अतिक्रमण मुक्त करायची असेल तर कायद्यानुसार आपल्याला ती जमीन परत मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. मित्रांनो जमिनीवर असलेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी करावयाचा अर्जाची प्रक्रिया बऱ्याच जणांना माहीत नसते. परंतु एक अर्जाच्या माध्यमातून ती जमीन आपल्याला अतिक्रमण मुक्त करता येते. त्यामुळे आपण आजच्या या पोस्टमध्ये Atikraman Jamin Parat मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जमिनीवर किंवा कोणत्याही सरकारी जागेवर अनेक वेळा बऱ्याच जणांकडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो. अतिक्रमण करणारे अशी व्यक्ती एक-दोन वर्षे त्या जागेवर चुपचाप राहतात, परंतु काही कालांतराने ही व्यक्ती त्या जागेवर त्यांच्या मालकी हक्क दाखवतात म्हणजेच त्या Atikraman Jamin पूर्णतः अतिक्रमण करून ती जागा त्यांचीच असल्याचे सांगतात.

 

परंतु मित्रांनो देशात असणाऱ्या कायद्यानुसार आपल्याला कोणत्याही ठिकाणी अतिक्रमण करता येत नाही. बऱ्याच वेळा शासनाकडून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना नोटीस पाठवण्यात येतात. तसेच शासनाच्या माध्यमातून अतिक्रमण केलेल्या व्यक्तींची घरे किंवा संपत्ती काढण्यात येते. परंतु मित्रांनो जर एखाद्याने एखाद्याच्या जमिनीवर किंवा प्लॉटवर अतिक्रमण केलेले असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण आता काय करायचे हे समजत नाही.

 

अतिक्रमण हटवण्याचा अर्ज कसा करायचा?

आपण कायद्याचा आधार घेत योग्य पद्धतीने अतिक्रमण हटवण्याचा अर्ज केला तर लवकरात लवकर त्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात येते. अतिक्रमण हटवण्यासाठी करावयाचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून तो अर्ज आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.

विहित नमुन्यातील ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून तुम्हाला त्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्या अर्जामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीचे नाव कोणत्या ठिकाणी त्या व्यक्तीने अतिक्रमण केलेले आहे. याचा संपूर्ण तपशील तसेच इतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.

 

अतिक्रमण केलेली जमीन परत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

 

अशाप्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने अतिक्रमण केलेली जमिनीला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अर्ज करून ती जमीन अतिक्रमणापासून मुक्त करू शकतो. अतिक्रमण केलेली जमिनीवर अतिक्रमण हटवण्यासाठी वरील लिंक वरून तुम्ही तो अर्ज तुमच्या मोबाईल मध्ये पाहू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!