मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्र तसेच सेतू केंद्र हे उपलब्ध करून देण्यात येत असते. वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक जिल्ह्याकरिता आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी नवीन अर्ज मागविण्यात येत असतात. अशाच अकोला जिल्हा करिता Apale Sarkar Seva Kendra Akola करिता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. अकोला जिल्हा आपले सरकार सेवा केंद्र करिता करावयाची अर्ज प्रक्रिया तसेच अटी व शर्ती या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो अकोला जिल्ह्यातील महानगरपालिका प्रभाग तसेच नगरपरिषद व नगरपंचायत आणि ग्रामपंचायत मध्ये Apale Sarkar Seva Kendra Akola 2023 स्थापन करण्याकरिता 176 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याकरिता सीएससी केंद्र चालकांकडून तसेच स्थानिक केंद्र चालकांकडून नवीन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत उपलब्ध असलेल्या रिक्त जागांचा तपशील तसेच इतर सर्व माहिती अकोला जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आपले सरकार सेवा केंद्र अकोला अंतर्गत कोण अर्ज करू शकतो? Who Can Apply For ASSK Akola?
जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही सर्वप्रथम त्या जिल्ह्याचे रहिवासी असावे लागतात. तसेच ज्या गावांमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये हे आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत रिक्त जागा आहे त्या गावातील अर्ज करणाऱ्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येत असते. तसेच ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच सीएससी सेंटर आहे किंवा स्थानिक केंद्र धारक आहेत अशा उमेदवारांना अर्ज करता येतो.
अकोला आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख?
अकोला जिल्ह्याच्या वतीने www.akola.gov.in या अधिकृत जिल्ह्याच्या वेबसाईटवर आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक पात्र असलेल्या अर्जदारांनी 20 तारखे पूर्वी त्यांचा अर्ज सादर करायचा आहे. अर्जदारांनी ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे त्याच ठिकाणी त्यांना आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावे लागेल. जर तुम्ही यापूर्वी आधार सेवा केंद्र मिळवण्यासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.
पी एम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले का? ते असे चेक करा ऑनलाईन
आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? How to Apply For Apale Sarkar Seva Kendra?
मित्रांनो अकोला जिल्ह्याचा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र करिता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अकोला जिल्ह्यातील जिल्हा सेतू समितीमार्फत अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी एक गुगल फॉर्म तयार करण्यात आलेला आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. अर्जदारांनी त्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे. आपले सरकार सेवा केंद्र संदर्भातील पुढील अपडेट जिल्ह्याच्या वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या प्रत्येक अर्जदारांनी वेळोवेळी जिल्ह्याची वेबसाईट चेक करत राहावी.
आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन अर्ज येथे करा
प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागांमध्ये किंवा वेळापत्रकामध्ये तसेच कोणत्याही बाबींमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तसेच जिल्हा सेतू समिती यांच्याकडे राखीव आहेत.
आवश्यक कागदपत्रे Documents for Apale Sarkar Seva Kendra
1. आधार कार्ड
2. अर्जदाराचे पॅन कार्ड
3. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र
4. नमुना अर्ज
5. शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रमाणपत्र
6. अर्जदाराकडे सीएससी केंद्र असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
7. एम एस सी आय टी प्रमाणपत्र
असल्यास तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
पीएम कुसुम योजना राज्यातील सर्व जिल्ह्याची पात्र व अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर; लगेच चेक करा
आपले सरकार सेवा केंद्र अकोला संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा