अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत व्यवसायासाठी 10 लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी नवीन अर्ज सुरू | Annasaheb Patil Karj Yojana

मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणारे अनेक प्रकारचे योजना विविध प्रवर्गातील व्यक्तींकरिता राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारची महत्त्वाची व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणारी योजना म्हणजे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना होय. या योजनेअंतर्गत 10 लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. Annasaheb Patil Karj Yojana करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे, पात्रता तसेच अर्ज प्रक्रिया व इतर सर्व माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत मराठा समाजातील व्यावसायिक बनू इच्छिणाऱ्या तरुणांना दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो राज्यात महामंडळाच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना कार्यरत आहेत. त्यापैकी मराठा समाजाकरिता असलेली ही Annasaheb Patil Loan Scheme एक महत्त्वाची योजना आहे. सध्या ही योजना राज्यात राबविण्यात येत असून या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना संदर्भात शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे.

 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्रता

मराठा समाजाकरिता राबविण्यात येणाऱ्या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत खालील पात्रता आहे.

1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा

2. अर्जदाराचे वय हे 50 वर्षापेक्षा कमी असावे

3. अर्जदाराकडे आधार कार्ड असावे

4. अर्जदाराची आधार कार्ड त्यांच्या बँक सोबत लिंक असावी

5. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही कर्ज योजनेचा लाभ मिळवलेला नसावा.

6. अर्जदार हा मराठा समाजातील असावा

 

आभा कार्ड कसे काढायचे? देशात कुठेही मिळणार मोफत उपचार; घरबसल्या काढा हे कार्ड, अनेक फायदे

आवश्यक कागदपत्रे Required Documents For Annasaheb Patil Karj Yojana

या कर्ज योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड

2. रेशन कार्ड

3. कास्ट सर्टिफिकेट

4. उत्पन्न दाखला

5. व्यवसायाचे ज्ञान असल्याबाबत प्रमाणपत्र

6. विज बिल

7. शॉप ॲक्ट लायसन्स किंवा उद्योग आधार

8. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल

9. व्यवसायाचा फोटो

पी एम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले का? ते असे चेक करा ऑनलाई

10 लाख रुपये कर्ज मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा? How to Apply for Annasaheb Patil Karj Yojana?

मित्रांनो मराठा समाजाकरिता राबविण्यात येणाऱ्या या अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच या योजने संदर्भात अधिकृत माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. योजने अंतर्गत करावयाच्या अर्ज सोबत जोडावयाची परिपत्रके आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लाभ मिळण्यासाठी येथे आत्ताच अर्ज करा

 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजने संदर्भात विस्तृत माहिती येथे पहा

 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा शासन निर्णय येथे पहा

 

मित्रांनो वरील प्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातील तरुणांना उद्योजक तसेच व्यावसायिक बनवण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणारी महत्त्वाची योजना Annasaheb Patil Karj Yojana Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे. या योजनेसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर वरील शासन निर्णय तसेच योजनेचा पीडीएफ वाचून घ्यावा.

ही माहिती महत्त्वपूर्ण असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!