गुढीपाडव्याच्या दिवशी रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात तेल, रवा, चणा डाळ, साखर वाटप होणार; आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय जाहीर; | Anandacha Shidha

मित्रांनो महाराष्ट्र शासन राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 100 रुपयात आनंदाची शिधा वाटप करण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता राज्यातील रेशन कार्डधारकांना फक्त शंभर रुपयांत तेल, रवा, चणा डाळ, साखर यांचे वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या या निर्णयासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा कोणत्या रेशन कार्डधारकांना लाभ मिळेल, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. आजच्या पार पडलेल्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय जाहीर

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 100 रुपये या अतिशय कमी शुल्कात आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात येणाऱ्या महत्त्वाच्या सणांमध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब शिधापत्रिकाधारकांना अतिशय कमी खर्चात शासनाकडून उच्च दर्जाचे धान्य मिळणार आहे.

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने यापूर्वी दिवाळीच्या वेळेस शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटलेला होता. त्यामुळे आता तशाच प्रकारे गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा राज्यातील शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येत आहे.

 

आनंदाचा शिधा मध्ये खालील वस्तूंचा समावेश

मित्रांनो आनंदाचा शिधा करिता शिधापत्रिका धारकांना केवळ शंभर रुपये द्यायचे असतात उर्वरित रक्कम महाराष्ट्र शासन भरत असते. या आनंदाचा शिधा मध्ये शिधापत्रिका धारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल इत्यादी वस्तू मिळणार आहे.

 

आनंदाचा शिधा किती रुपयात मिळेल?

शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळवण्याकरिता केवळ शंभर रुपये द्यावे लागतील. उर्वरित रक्कम महाराष्ट्र शासन राज्य शासनाच्या कोट्यातून खर्च करेल. राज्यातील जवळपास 01 कोटी 63 लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे.

 

100 रुपयात आनंदाचा शिधा कुणाला मिळणार?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत वाटप करण्यात येणार हा आनंदाचा शिधा राज्यातील शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येत आहे. अंत्योदय अन्न योजना, तसेच राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील तसेच केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्यात येणार आहे.

या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 13600 रुपये रक्कम मंजूर; पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शिधाचे वाटप कधी होणार?

मित्रांनो राज्यातील वरील रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा तसेच एक किलो चणाडाळ व एक किलो साखर आणि एक लिटर तेल इत्यादी वस्तू गुढीपाडवा या सणापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरित करण्यात येणार आहे. ही ई-पॉसद्धारे रेशन कार्डधारकांकडून केवळ शंभर रुपये घेऊन एक किट शिधा देण्यात येणार आहे. ज्या रेशन दुकानांमध्ये ई-पॉसची सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी ऑफलाईन वाटप करण्यात येणार आहे.

या शेतमजुरांना मिळत आहे जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान; जाणुन घ्या कुणाला मिळेल लाभ, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे येथे पहा 

100 रुपयात रवा, तेल, चणा डाळ, साखर वाटप ची अमलबजावणी कशी होणार?

राज्य शासनाच्या मार्फत 100 रुपयात शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणाऱ्या या आनंदाचा शिधा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा काढण्यात येत आहे. महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टल वर टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!