आभा कार्ड कसे काढायचे? देशात कुठेही मिळणार मोफत उपचार; घरबसल्या काढा हे कार्ड, अनेक फायदे | Abha Card Information Marathi

इतरांना आपल्या महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाच्या मार्फत आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा कार्ड काढणे सुरू झालेले आहेत. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत मध्ये हे कार्ड नागरिकांना मोफत काढून देण्यात येत आहेत. या आभा कालचे अनेक फायदे आहेत त्यामुळे हे आभा कार्ड काढण्याची आवाहन राज्य सरकारने केलेले आहे. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण हे Abha Card काय आहे? आभा कार्ड कसे काढायचे? व याचे फायदे या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

आभा कार्ड काय आहे? What is Abha Card

मित्रांनो आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा कार्ड होय. हे Abha Card तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. राज्य सरकारच्या मार्फत नागरिकांना हे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट काढण्याची आवाहन करण्यात आलेले आहे. आपल्या देशात केंद्र शासनाच्या मार्फत aayushman Bharat digital health mission सध्या सुरू आहे याच अंतर्गत नागरिकांना मोफत आभा कार्ड काढता येत आहे. हे कार्ड आपण आपल्या मोबाईल वरून देखील काढू शकतो.

मित्रांनो तुम्ही आभा कार्ड काढले म्हणजे तुमचे एक प्रकारे डिजिटल हेल्थ अकाउंट तयार होते. तुम्हाला हे कार्ड काढल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा नंबर देण्यात येतो. तो तुम्ही जपून ठेवा किंवा हे कार्ड प्रिंट करून ठेवावे.

सर्वात महत्वाची बातमी, खरीप पिक विमा 2022 खात्यात जमा होण्यास सुरुवात!

आभा कार्ड चे फायदे? Benifits of Abha Card:-

मित्रांनो आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा कार्डचे खालील प्रमाणे अनेक फायदे आहेत.

1. आपण कोणत्या ठिकाणी कोणती ट्रीटमेंट घेतलेली आहे, याची सर्व माहिती यामध्ये साठवून राहील.

2. तुमची आरोग्याशी संबंधित सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होईल.

3. जर तुम्ही एखादा दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यांमध्ये शिफ्ट झाला तर डॉक्टरांना मागील दवाखान्यांमध्ये मिळवलेल्या उपचारा संबंधित सर्व माहिती सहज मिळवता येईल.

4. जेणेकरून तुम्हाला पुढील ट्रीटमेंट मिळवणे सहज सोपे जाईल.

5. डॉक्टरांना पुन्हा पुन्हा रिपोर्ट तयार करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट पुन्हा पुन्हा करण्याची आवश्यकता पडणार नाही, त्यामुळे तुमचा खर्च वाचेल.

6. डॉक्टरांना तुमच्यावर उपचार करण्यास सोपे जाईल. कारण की त्यांच्याकडे पूर्वीची सर्व माहिती उपलब्ध असेल.

7. भविष्यामध्ये विविध प्रकारच्या योजना या कार्ड अंतर्गत राबविण्यात येऊ शकतात.

खरीप पिक विम्याचे 724 कोटी रुपये लवकरच या शेतकऱ्यांना मिळणार; सरसकट पिक विमा मंजूर शासन निर्णय जाहीर

मित्रांनो अशा प्रकारचे वरील अनेक फायदे या आयुष्यमान भारत हेल्थ आयडी कार्ड चे आहेत. तसेच येणाऱ्या काळामध्ये वेळोवेळी राज्य तसेच केंद्र शासनाच्या मार्फत अनेक प्रकारच्या योजनांचा समावेश या कार्ड अंतर्गत करण्यात येऊ शकतो.

 

मोफत आभा कार्डची नोंदणी येथे करा

 

 

आभा कार्ड असे काढा ऑनलाईन घरबसल्या How to apply for Abha Card?

मित्रांनो आपण Abha Card फक्त पाच मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून ऑनलाईन देखील काढू शकतो. त्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया करा.

1. आभा कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये आभा कार्ड नोंदणी करण्याची वेबसाईट ओपन करा. वेबसाईट आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिली आहे.

2. आता या Create ABHA number या पर्यायावर क्लिक करून पुढे using adhar number या ऑप्शनवर क्लिक करा.

3. आता तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी प्रविष्ट करा त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.

4. आता तुमचे आधार कार्ड प्रमाणे तिथे माहिती दिसत असेल. आधार कार्डचा ओटीपी टाकून ऑथेंटीकेशन करून घ्या.

5. आता तुमच्या समोर तुमचा 14 अंकाचा आभा का नंबर आलेला असेल. तो नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवावा.

6. आता याच वेबसाईटवर लॉगिन करा आणि तुमचे आभा कार्ड पीडीएफ स्वरूपात सेव करून ठेवा.

 

मोफत आभा कार्ड ऑनलाइन काढण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अशाप्रकारे आभा कार्ड संदर्भातील एक छोटीशी अपडेट आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!