50000 अनुदान या दिवशी होणार खात्यात जमा; नवीन शेवटची पात्र आणि अपात्र यादी होणार जाहीर; महत्वाचं अपडेट | 50000 Anudan Yojana Maharashtra

शेतकरी मित्रांनो पन्नास हजार अनुदान योजनेअंतर्गत पन्नास हजार खात्यात जमा होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांकरिता महत्त्वाची अपडेट प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन वितरित करण्यासाठी नवीन एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता 50000 Anudan Yojana ची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच राज्य शासनाकडून पन्नास हजार अनुदान योजनेची अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे, तसेच अपात्र शेतकऱ्यांची सुद्धा यादी प्रकाशित करण्याचे अपडेट आहे.

 

शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन याद्या प्रकाशित झालेल्या असून सर्व जिल्ह्यांच्या तीन याद्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे. परंतु यादीत नाव आलेली असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना अजून पर्यंत पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ही रक्कम वितरित करण्यासाठी शासनाच्या मार्फत नवीन निधी 1000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे.

 

50000 अनुदान खात्यात केव्हा येणार? 50000 Anudan Yojana

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाआयटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असून जे शेतकरी अजून पर्यंत प्रतीक्षेत आहेत, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात या महिन्याच्या शेवटपर्यंत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

50,000 अनुदान योजनेची आज जाहीर झालेली नवीन यादी येथे पहा

 

 

50000 अनुदान योजनेची शेवटची यादी केव्हा येणार? Niyamit Karjmafi List

शेतकरी मित्रांनो मार्च 2023 च्या शेवटपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या मार्फत पन्नास हजार अनुदान योजनेची अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांचा समावेश या नवीन Niyamit Karj Mafi 50000 Anudan Yadi करण्यात येणार असून ही यादी अंतिम असणार आहे. तसेच पन्नास हजार अनुदान योजनेची अपात्र शेतकऱ्यांची सुद्धा यादी प्रकाशित करण्याची अपडेट प्राप्त झालेली आहे. त्यामुळे कोणते शेतकरी अपात्र बसतील तसेच जे शेतकरी अपात्र यादीमध्ये बसलेले आहेत त्यांचे कारण सुद्धा त्या ठिकाणी नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे जर ते शेतकरी बसू शकणार असेल तर ती चूक दुरुस्त करून नवीन यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात येईल.

 

सर्व जिल्ह्यांच्या नुकत्याच नवीन जाहीर झालेल्या कर्जमाफी याद्या येथे पहा

 

50 हजार अनुदान योजनेची नवीन अंतिम यादी मार्च 2023 च्या शेवटपर्यंत येणार आहे. त्यामुळे जे शेतकरी अजून पर्यंत नवीन यादीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!