स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्याकरिता नवीन अर्ज सुरू | Swast Dhanya Dukan Arj

 

मित्रांनो नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळवण्याकरिता पुणे जिल्ह्यातील काही गावांकरिता अर्ज सुरू झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानाचा परवाना वितरित करण्यात येत असतो. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांकरिता स्वस्त धान्य दुकान परवाना वितरण करिता नवीन अर्ज मागविण्यात येत आहेत. Swast Dhanya Dukan Parwana Arj संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्याकरिता नवीन अर्ज सुरू | Swast Dhanya Dukan Arj
स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्याकरिता नवीन अर्ज सुरू | Swast Dhanya Dukan Arj

 

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग यांच्या शासन निर्णयानुसार गावामध्ये नवीन स्वस्त धान्य दुकान चालू करण्याकरिता शासनाच्या वतीने परवान्याची वितरण करण्यात येत असते. स्वस्त धान्य दुकान पुणे जिल्हा करिता परवाना वितरण करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. स्वस्त धान्य दुकान परवाना संदर्भात पुढील माहिती आता आपण खाली जाणून घेऊया. Manifesto Approval of fair price shops

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्याकरिता अर्ज करण्याची तारीख Swast Dhanya Dukan Parwana Pune:-

पुणे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्याकरिता सदर अर्जदारांना 02 जानेवारी 2023 पासून 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सादर करायचा आहे. अर्ज अंतिम तारखेच्या आत कार्यालयीन वेळेमध्ये सुट्टीचे दिवस वगळून जमा करायचे आहेत. अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची अर्ज स्वीकारण्यात येणार नाही त्यामुळे ऑफलाइन अर्ज अंतिम तारखेच्या सादर करावे. अर्ज सादर करताना उमेदवारांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सुद्धा सादर करावे लागतील.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळवण्याकरिता खालील प्रमाणे प्राधान्यक्रम आहे:-

महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळवून देण्याकरिता काही प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आलेला आहे. त्या प्राधान्य क्रमानुसार लाभार्थ्यांना Swast Dhanya Dukan Parwana वितरण करण्यात येतो.

1. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था)
2. नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट
3. नोंदणीकृत सहकारी संस्था
4. नोंदणीकृत सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास
5. महिला स्वयंसहायता बचत गट
6. महिला सहकारी संस्था

महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व शेतकरी योजना येथे पहा

 

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या अर्जावर वरील प्राधान्य क्रमानुसार परवान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

जर Swast Dhanya Dukan Licence अंतर्गत पंचायत संस्था किंवा गटांची निवड झाल्यास त्यांना कमीत कमी तीन महिन्याचे धान्य उचलावे लागेल. म्हणजे तीन महिन्याचे धान्य उचलण्याची क्षमता त्या गटाकडे किंवा संस्थेकडे असावी.

 

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळवण्याकरिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Swast Dhanya Dukan Parwana :-

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्याकरिता प्रत्येकाला वेगवेगळी कागदपत्रे लागतात त्यापैकी काही कागदपत्रे ही सर्वांकरिता समान आहेत. जर महिला गटाद्वारे अर्ज केला तर त्यांना वेगळी कागदपत्रे त्याचप्रमाणे सहकारी संस्थेद्वारे अर्ज केला तर त्यांच्याकरिता काही वेगळी कागदपत्रे लागतात. संपूर्ण कागदपत्रे जाणून घेण्याकरिता Swast Dhanya Dukan Parwana मिळवण्याचा जाहीरनामा वाचून घ्यावा.

1. ग्रामसभेचा ठराव
2. आर्थिक दृष्ट्या दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचा गटविकास अधिकारी यांचा दाखला
3. सहकारी संस्थेद्वारे अर्ज केल्यास सहकारी संस्था नोंदणी बाबत प्रमाणपत्र.
4. बँक पासबुकची झेरॉक्स किंवा बँक स्टेटमेंट
5. जागे बाबत कागदपत्रे जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र जागा स्वतःची असल्यास घर टॅक्स पावती किंवा इतर कागदपत्र
6. सचिव अध्यक्ष व उपाध्यक्ष व सर्व सभासदांची नावे पूर्ण पत्त्यासह (स्वयंसहायता बचत गट किंवा संस्था यांच्याद्वारे अर्ज केल्यास)
7. सर्व कागदपत्रे जाणून घेण्याकरिता जाहीरनामा वाचावा.

 

स्वस्त भाव धान्य दुकान जाहीरनामा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकान परवाना मिळवण्याकरिता जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनामा वाचून घ्यावा. वरील जाहीरनाम्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.

कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानाकरिता अर्ज करण्यासाठी वेळापत्रक:

1. अर्ज करण्याची तारीख 13 जानेवारी 2023 ते 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत

2. अर्ज दारांकडून प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी तसेच अर्जदारांच्या जागेची तपासणी व इतर कार्यवाही 13 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्च 2023 पर्यंत

3. नवीन रास्त भाव धान्य दुकान परवाने मंजूर करणे 13 मार्च 2023 ते 12 एप्रिल 2023 पर्यंत.

रास्त भाव धान्य दुकान कोल्हापूर अंतर्गत अटी व शर्ती तसेच आवश्यक पात्रता व इतर माहिती करीता पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी संपर्क साधावा.

हे नक्की वाचा: आपले सरकार सेवा केंद्र  मिळविण्यासाठी 2023 करिता नवीन अर्ज सुरू

 

स्वस्त धान्य दुकान परवाना पुणे संदर्भात ही छोटीशी अपडेट तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!