शेतकरी नुकसान भरपाई भरपाई वितरणाच्या प्रक्रियेत बदल; अशी मिळणार नुकसान भरपाई | Shetkari Nuksan Bharpai 2023 Maharashtra

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकसान अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरण करण्याची प्रक्रिया सुलभ व पारदर्शकपणे व्हावी याकरिता शेतकरी नुकसान भरपाईच्या वितरण प्रक्रियेमध्ये काही बदल केलेले आहेत. आता शेतकऱ्यांना पूर्वीच्या प्रक्रियेनुसार कोणत्याही नुकसान भरपाईची वितरण होणार नसून नवीन पद्धत ही शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढून सुरू करण्यात आलेली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण nuksan bharpai वाटपाकरिता असलेली पूर्वीची पद्धत आणि सध्याची नवीन पद्धत या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी नुकसान भरपाई भरपाई वितरणाच्या प्रक्रियेत बदल; अशी मिळणार नुकसान भरपाई | Shetkari Nuksan Bharpai 2023 Maharashtra

 

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पूर परिस्थितीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कोणत्याही प्रकारच्या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास राज्य शासन त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई(Shetkari Bharpai Maharashtra) पोटी नुकसान भरपाई वितरित करत असते. Shetkari Nuksan Bharpai 2023 Maharashtra अंतर्गत आता शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने नुकसान भरपाईची वितरण करण्यात येणार असून त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.

 

 

नुकसान भरपाई वाटपाची पूर्वीची पद्धत Shetkari nuksan bharpai Old Process

शेतकरी मित्रांनो कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नुकसान झालेले असल्यास सुरुवातीला पंचनामे करण्यात येतात त्यानंतर तलाठी यांच्यामार्फत लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या या वैयक्तिक माहिती तसेच आधार कार्ड क्रमांक लाभार्थ्यांची बँकेची डिटेल्स इत्यादी जमा करून करत होते. त्यानंतर तलाठीच्या मार्फत जमा करण्यात आलेली, ही माहिती तसेच शेतकऱ्यांच्या तयार केलेल्या याद्या ह्या तलाठी हा तहसीलदार यांना सादर करत असतो. विभागीय आयुक्ताच्या मार्फत शासनाकडे Shetkari nuksan bharpai करिता अनुदानाची मागणी करण्यात येत असते. त्यानंतर शासनाच्या मार्फत nuksan bharpai Maharashtra वितरणास शासन निर्णय द्वारे मान्यता दिल्यानंतर ते पैसे संबंधित आयुक्तांना वितरित होतात त्यानंतर ते पैसे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतात. जिल्हाधिकारी यांच्याकडून ते पैसे तहसीलदार यांच्याकडे प्राप्त होतात. त्यानंतर शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येत होते. Nuksan Bharpai 2023

 

परंतु या प्रक्रियेमध्ये खूप जास्त वेळ लागत होता. शासनाने नुकसान भरपाई(nuksan Bharpai Maharashtra 2023) मंजूर केल्यानंतर चार ते पाच महिन्यानंतर शेतकऱ्यांना ती मिळत होती. तसेच या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा तपशील तसेच इतर माहिती चुकल्यामुळे त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नव्हते. परिणामी शेतकऱ्यांची नुकसान होत होते. परंतु आता नव्या नियमानुसार Shetkari Nuksan Bharpai Nidhi वितरित होणार असून या संदर्भात शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे.

 

 

नुकसान भरपाई वाटप नवीन शासन निर्णय जाहीर Nuksan Bharpai Maharashtra GR

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी Nuksan Bharpai Vitaran करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याकरिता महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांना आपल्या महाराष्ट्र राज्यात कर्जमुक्ती योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत MAHA IT ही प्रक्रिया ऑनलाइन राबवित आहे. शेतकऱ्यांची आधार कार्डच्या माध्यमातून ओळख पटवून MAHA IT यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे. आता याच धरतीवर MAHA IT यांचेकडून यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Shetkari Nuksan Bharpai) वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या बाबतचा शासन निर्णय पाहायचा असेल तर तो खाली दिलेला आहे.

 

शासन निर्णय pdf येथे पहा

 

नुकसान भरपाई निधी वाटपाची नवीन पद्धत अशी असेल Shetkari Nuksan Bharpai New Process

1. मित्रांनो शेतकऱ्यांना Nuksan Bharpai चे वितरण करण्याकरिता MAHA IT या कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सर्व संबंधित तहसीलदार हे नुकसान भरपाईस पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांची माहिती ही Excel format मध्ये भरून सादर करतील. याकरिता महाआयटीच्या पोर्टलवर तहसीलदारांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येईल.

2. आता तहसीलदार यांच्याकडून प्राप्त झालेल्या याद्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत किंवा प्रांताधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत अनुमोदित करण्यात येतील. या Shetkari nuksan bharpai च्या याद्या शासनाने यासाठी मंजूर केलेल्या जिल्हानिहाय निधीच्या मर्यादेत अनुमोदीत करण्यात येतील.

3. आता तहसीलदार यांचे मार्फत प्राप्त झालेली माहिती संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यात येईल. जर यामध्ये काही त्रुटी किंवा दुरुस्ती असतील किंवा शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये काही बदल करावयाचे असतील तर ते या ठिकाणी दिसतील. यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ती तहसीलदार यांना करता येईल.

4. पुन्हा दुरुस्त केलेली माहिती तहसीलदार यांच्या मार्फत सादर करण्यात येईल. आता शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यात येईल ही Shetkari nuksan bharpai yadi Maharashtra शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल तसेच ग्रामपंचायत निधीतील ही यादी उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व शेतकऱ्यांकरिता ही यादी उपलब्ध झाल्यानंतर शेतकरी सीएससी सेंटरवर जाऊन त्यांच्या आधार क्रमांक चे सहाय्याने आधार प्रमाणीकरण करून घेतील.

5. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल. Nuksan Bharpai चे आधार प्रमाणीकरण करण्याकरिता शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही. आधार प्रमाणीकरणाची सेवा शेतकऱ्यांसाठी विनाशुल्क असेल.

 

महत्वाचं अपडेट: या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे वितरित करण्यासाठी 675 कोटी मंजूर; यादी जाहीर 

मित्रांनो अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात नुकसान भरपाई वितरणाकरिता नवीन पद्धत सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही पद्धत खूप चांगली असून शासनाने या पद्धतीला मान्यता दिलेली आहे. ही माहिती सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. तसेच Shetkari Nuksan Bharpai 2023 ची ही नवीन पद्धत तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल देखील कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता techinfomarathi.in या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment