आरटीई प्रवेश 2023 अर्ज सुरू; अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, नियम व अटी | RTE Admission 2023 Maharashtra

मित्रांनो आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायदा या अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवून देण्याकरिता 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत असतात. या RTE Admission अंतर्गत राज्यात असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना अर्ज करून खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळवता येत असतो. आपण या पोस्टमध्ये आरटीई प्रवेश 2023 कसा करायचा? तसेच त्याकरिता सर्व आवश्यक कागदपत्रे व नियम अटी या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

आरटीई प्रवेश 2023 अर्ज सुरू; अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, नियम व अटी | RTE Admission 2023 Maharashtra

 

 

मित्रांनो समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील विद्यार्थ्यांनी कंपल्सरी मोफत शिक्षण मिळावे या दृष्टीने Right to Education Act हा तयार करण्यात आलेला आहे. या आरटीई कायद्यानुसार या घटकातील विद्यार्थ्यांना अनेक नामांकित खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 करिता या rte अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर या RTE Admission 2023-24 Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेत आहोत.

 

 

आरटीई प्रवेश 2023-24 माहिती RTE Admission 2023-24 Information Marathi:-

मित्रांनो शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता सर्वप्रथम शाळांना नोंदणी करायची असून आरटीई ऍडमिशन 2023 करिता संबंधित शाळांना 23 जानेवारी 2023 ते 3 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये नोंदणी करायची आहे. आरटीई प्रवेश 2023 अंतर्गत शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन करिता पालकांना अर्ज करावे लागणार आहे. सध्या शाळांची नोंदणी सुरू आहे.

 

Rte admission 2023 करिता शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेली आहे. वरील तारखेनुसार अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पोस्ट मध्ये आपण RTE Admission 2023-24 Maharashtra Documents List सुद्धा जाणून घेणार आहोत.

 

 

आरटीई प्रवेश 2023 करिता पालकांनी अर्ज केव्हा करायचे?

आरटीई मोफत ऍडमिशन 2023 करिता सध्या शाळांचे अर्ज सुरू असल्यामुळे त्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला पालकांना त्यांच्या पाल्याच्या मोफत प्रवेशाकरिता अर्ज करता येणार आहे.

 

Rte प्रवेश 2023 पालकांनी करायचे अर्ज सुरू:

Rte free admission 2023 करिता 01 मार्च 2023 पासून अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज हे 1 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 पर्यंत करता येणार आहे.

 

मित्रांनो rte free admission करिता पालकांना अर्ज करता येत आहेत, त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जुळवून ठेवावी. आरटीई मोफत प्रवेश 2023-24 करिता आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची माहिती आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

आर टी ई मोफत प्रवेश 2023 करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for RTE Admission 2023 Maharashtra:-

मित्रांनो right to education act अंतर्गत राखीव ठेवण्यात येणाऱ्या 25% रिक्त जागा अंतर्गत rte admission मिळण्याकरिता विद्यार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

1. जातीचा दाखला

2. रहिवासी दाखला

3. जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याबाबत प्रमाणपत्र

4. उत्पन्नाचा दाखला (आर्थिक दृष्ट्या दुर्बल असण्याकरिता उत्पन्न दाखल्यावर 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असावे)

5. विद्यार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र

6. अनाथ बालके असल्यास त्या बाबत कागदपत्रे

7. Hiv बाधित असल्यास त्या बाबत कागदपत्रे

आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश कसा मिळेल? Process of RTE Admission 2023-24 :-

मित्रांनो आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवण्याकरिता सर्वप्रथम अर्ज करावा लागतो. त्यानंतर वरील कागदपत्रे ही विद्यार्थ्यांकडे असावी लागते. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी ही गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून त्यांच्यामार्फत करण्यात येते. त्यानंतर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आरटीई मोफत प्रवेश अंतर्गत नामांकित खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो.

 

Rte admission अर्ज करण्याची वेबसाईट

 

तर मित्रांनो अशा प्रकारे शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी नामांकित शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवून मोफत प्रवेश देण्यात येत असतो.

मोफत प्रवेश करिता वयोमर्यादा येथे पहा 

RTE Admission 2023-24 संदर्भातील ही माहिती महत्त्वपूर्ण असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारची माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या या वेबसाईटवर भेट देत रहा.

1 thought on “आरटीई प्रवेश 2023 अर्ज सुरू; अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, नियम व अटी | RTE Admission 2023 Maharashtra”

Leave a Comment

error: Content is protected !!